Rakshabandhan: भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, भावा-बहिणीमध्ये वाढेल प्रेम

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 28, 2022 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raksha Bandhan 2022: श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पोर्णिमेला भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण साजरा केला जातो. यावेळेस बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिला कायम रक्षा करण्याचे वचन देतो.

rakshabandhan
भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात 
थोडं पण कामाचं
  • रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करताना ध्यानात ठेवा काही गोष्टी
  • विचार करून राखीच्या रंगाची निवड करा
  • भावाने बहिणीच्या पाया पडावे

मुंबई: श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला भगवान शिव समस्त प्रकृतीला रक्षा करण्याचे वचन देत विष ग्रहण केले होते. रक्षा वचनाने असो, प्रकृतीचे असो, व्यक्तीचे असो, राज्याचे असो, रक्षाचे तत्व हे शिव तत्व आहे. भाऊ बहिणीला यावेळेस रक्षा करण्याचे वचन देतो. यामागेही शिव तत्व आहे. ज्या पद्धतीने आस्तिक, नास्तिक, भगवान शंकराच्या जवळ असलेले तसेच दूर असलेल्या सर्वांवर भगवान शंकराची नजर असते.रक्षाबंधनाचा(rakshabandhan) सण जवळ आल्याने बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. मात्र बहिणीने भावाला राखी बांधताना काही गोष्टींची जरूर काळजी घ्यावी.  Know this  things during rakhi buying

अधिक वाचा - लोकांशी बोलताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना?

राखी खरेदी करताना रंगाची घ्या काळजी

सूती धाग्याने बनवलेली राखी उत्तम असते. जर रक्षा सूत्र नसेल नसेल तर बहीण भावाच्या हातावर कलावा बांधू शकते. राखी खरेदी करताना नेहमी काळ्या अथवा भुऱ्या रंगाची असता कामा नये. मुलांना हायटेक राख्या पसंत असतात तुम्ही त्या खरेदी करू शकता. बहिणीकडून टिळा लावताना तसेच राखी बांधताना भावाचा हात रिकामा असू नये. बहिणीसाठी गिफ्ट असले पाहिजे. 

हा आहे शुभ मुहूर्त

हिंदू पंचागानुसार या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 पासून सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी, शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 पर्यंत राहील. यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.

अधिक वाचा - तुमचा आयफोन डुप्लिकेट तर नाही ना?

भावाने जरूर बहिणीच्या पाया पडावे

भावासाठी मिठाईची निवड करताना लक्षात ठेवा की मिठाई कडक असता कामा नये. मिठाईत रस असावा ज्यामुळे बहीण-भावामध्ये प्रेमाचा रस कधीही कमी न व्हावा. मिठाई काळ्या अथवा चॉकलेटी रंगाची असता कामा नये. जसे कालाजाम आणि चॉकलेट. फळे आणि मेवा भावाला खाऊ घालावा. एक लक्षात ठेवा की टिळा लावल्यानंतर बहिणीने आपल्या हाताने भावाला मिठाई खाऊ घालावी. आशीर्वादामध्ये कुटुंहबाच्या परंपरेचे पालन करा. जर तुमच्या येतेथे बहिणीच्या पाया पडण्याची परंपरा आहे तर नक्की पाया पडून आशीर्वाद घ्यावा. जर छोट्या बहिणीने भावाचे पाया पडली तर तिला आशीर्वाद द्यावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी