Hair Cut At Night Is Inauspicious: रात्रीचे केस कापले तर काय होतं?, खरंच अशुभ असतं?; जाणून घ्या काय आहे कारण

Inauspicious To Cut Hair At Night: हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रात्रीच्या वेळी करणे अशुभ मानले जाते. यापैकी एक म्हणजे केस कापणे. असे मानले जाते की रात्री केस कापल्याने मां लक्ष्मी क्रोधित होते. हा विश्वास शतकानुशतके चालत आला आहे. ज्याचे आजपर्यंत पालन केले जात आहे.

Inauspicious To Cut Hair At Night
रात्री केस कापणे का अशुभ मानले जाते?, जाणून घ्या त्यामागचं कारण 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात (Hinduism) अनेक प्रथा परंपरा आहेत. ज्या अजूनही पाळल्या जातात.
  • घरात अनेकवेळा वडीलधारी मंडळी नेहमीच रात्री (Night) नखे कापणे, रात्रीचे केस कापणे (Cutting their hair) , रात्री झाडू काढणे या आणि अशा अनेक गोष्टी करण्यापासून रोखतात.
  • विशेषतः हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला खूप महत्त्व दिले जाते आणि दिवसाची वेळ कोणत्याही कार्यासाठी अनुकूल मानली जाते.

मुंबई: Why Hair Is Not Cut At Night: हिंदू धर्मात (Hinduism) अनेक प्रथा परंपरा आहेत. ज्या अजूनही पाळल्या जातात. या प्रथा परंपरा गेल्या वर्षांनुवर्षे चालत आल्या आहेत. त्यातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा शास्त्रातही उल्लेख करण्यात आलेला आहे. या प्रथा परंपरा माहित असलेल्या लोकांना त्यामागचं कारण माहित नसते, मात्र तरीही ते या नियमांचं पालन करत असतात. घरात अनेकवेळा वडीलधारी मंडळी नेहमीच रात्री (Night) नखे कापणे, रात्रीचे केस कापणे (Cutting their hair) , रात्री झाडू काढणे या आणि अशा अनेक गोष्टी करण्यापासून रोखतात. खरंतर असं म्हटलं जात की, हिंदू धर्मात असं मानतात की रात्री केस कापल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि घरामध्ये दारिद्र्य आणते. हा विश्वास खरा मानून आजही लोक त्याचे पालन करतात. यामागचे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण काय आहे ते जाणून घेऊया.

जाणून घ्या त्याचं वैज्ञानिक कारण

ही गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास रात्री केस न कापण्याचे कारण म्हणजे रात्री केस इकडे तिकडे उडतात. त्यामुळे अनेक वेळा जेवणातही केस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची भीती असते. याशिवाय केसांमुळे घाण आणि बॅक्टेरिया पसरण्याची भीती असते. म्हणूनच रात्री केस कापण्यास नेहमीच मनाई करण्यात येते. 

अधिक वाचा-  काही मिनिटात घरच्या घरी चमकावा सोन्याचे दागिने

देवी लक्ष्मी रागावते

विशेषतः हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला खूप महत्त्व दिले जाते आणि दिवसाची वेळ कोणत्याही कार्यासाठी अनुकूल मानली जाते. सूर्यास्तानंतर केस किंवा नखे ​​कापू नयेत ही जुनी समजूत आहे जी आजही अनेक लोक पाळतात.

ज्योतिष शास्त्रानुसार रात्री केस कापणे अशुभ मानलं जातं. असं मानलं जातं की, संध्याकाळी लक्ष्मी घरात वास करते. महालक्ष्मी समृद्धी आणि धन या सोबतच आशीर्वाद देण्यासाठी रात्री घरी राहते, त्यामुळे सल्ला दिला जातो की रात्री केस कापू नयेत. यामुळे माता लक्ष्मीला राग येतो.

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि साहित्यावर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी