मुंबई: ज्योतिषशास्त्रात केवळ राशींच्या आधारावर व्यक्तीबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे लहान-मोठे पैलू आपल्याला समजतात. प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो. आणि त्याचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवर स्पष्टपणे दिसतो. ग्रहांमध्येही शत्रूता आणि मित्रतेचा भाव असतो. त्यामुळेत काही राशींचे एकमेकांशी पटते तर काहींचे नाही. अशातच लग्नासाठी राशीनुसार कम्पॅटिबिलीटी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर लाईफ पार्टनर्सच्या राशीच्या ग्रहांमध्ये शत्रूतेचा भाव असेल तर त्या व्यक्तींचे जुळणार नाही. Know your life partner according to your zodiac sign
अधिक वाचा - मला पण गुवाहाटीला न्या, चिमुकलीने केला CM शिंदेंकडे हट्ट
कुंडली जुळवण्याऐवजी राशींवरूनही जाणून घेता येते की कोणत्या राशींचे जुळणार आहे आणि कोणत्या राशींचे जमणार नाही. कोणती राशीची अथवा राशीचा पार्टनर त्या व्यक्तीसाठी परफेक्ट असू शकेल.
मेष -मेष राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि तूळ राशीचे लोक चांगले लाईफ पार्टनर ठरू शकतात.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी मकर आणि वृश्चिक राशीचे लोक चांगले लाईफ पार्टनर बनू शकतात.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ, तूळ आणि सिंह राशीचे लोक चांगले जोडीदार बनू शकतात.
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी सिंह, मेष अथवा धनू राशीच्या व्यक्तींना आपले लाइफ पार्टनर म्हणून निवडले पाहिजे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी धनू राशीच्या व्यक्ती बेस्ट पार्टनर ठरतील. याशिवाय ते कर्क, मेष, वृश्चिक आणि मीन राशी्या व्यक्तीलाही पार्टनर म्हणून निवडू शकतात.
कन्या -कन्या राशीच्या लोकांसाठी मकर अथवा वृषभ राशीचे पार्टनर चांगले ठरू शकतात.
तूळ - तूळ राशीसाठी बेस्ट पार्टनर कुंभ राशीचे असतील. मात्र त्यांचे मेष, मिथुुन आणि मकर राशीच्या लोकांसोबत चांगले जमेल.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वृषभ, धनू, कर्क आणि मीन राशीच्या व्यक्ती बेस्ट पार्टनर ठरू शकतात.
धनू - धनू राशींच्या व्यक्तींसाठी लाईफ पार्टनर सिंह अथवा मेष राशीचा असल्यास उत्तम.
अधिक वाचा - हार्दिक पंड्याच्या नावे नवं रेकॉर्ड
मकर - मकर राशीच्या लोकांनी वृश्चिक राशीचा जोडीदार निवडाला. याशिवाय वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीचे पार्टनरही चांगले ठरू शकतात.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी सिंह आणि वृषभ राशीच्या लोकांना जोडीदार बनवल्यास उत्तम,
मीन - मीन राशीच्या लोकांनी कर्क, मेष आणि वृश्चिक राशीच्या पार्टनरची निवड करावी.