श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२०: आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या व्रत, तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

Krishna Janmashtami 2020: आज (११ ऑगस्ट) भगवान श्री कृष्ण जन्माष्टमी. यंदा हा सोहळा ११ आणि १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जाणून घ्या जन्माष्टमीची तारीख, याचं व्रत, तिथी, महत्त्व आणि पूजा विधी याविषयी.

krishna janmashtami 2020
श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२०  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण या वेळी ११ आणि १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
  • मथुरा-वृंदावनमध्ये जन्माष्टमीनिमित्त विशेष तयारी
  • भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीवर झाला होता

मुंबई: भगवान श्री कृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. दरवर्षी त्यांच्या जन्मोत्सवावर जन्माष्टमी (krishna janmashtami 2020) म्हणजे साजरी केली जाते. आज (११ ऑगस्ट) श्रीकृष्ण जयंती साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. अनेक ठिकाणी बाळकृष्णासाठी खास पाळणा सजवला जातो आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची पूजा केली जाते. जाणून घ्या या दिवशी व्रत, (vrat)and तिथी (tithi), मुहूर्त (muhurat) आणि पूजा विधी (pooja rituals) कशी केली जाते. 

जन्माष्टमीच्या व्रताचे नेमके महत्त्व काय आहे?

देशभरात यंदा ११ आणि १२ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. जन्माष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे. हा सण भारतात अतिशय श्रद्धेने आणि भव्य स्वरुपात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी संपूर्ण भारतभर आनंदात आणि उत्साहाने साजरी केली जाते. प्रोढ असो वा लहान मुले प्रत्येक जण श्रीकृष्ण जन्माष्टमी अतिशय उत्साहाने साजरी करतात. या दिवशी कृष्ण मंदिरांची सजावट देखील केली जाते. विशेषत: वृंदावन, मथुरा येथे अत्यंत उत्साहाचे वातावरण असते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे?

श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वेळी हा उत्सव ११ आणि १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. परंतु जाणकारांच्या मते, १२ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं श्रेयस्कर आहे. जाणून घ्या जन्माष्टमीच्या तारखेविषयी संभ्रम का आहे ते.... ज्योतिषांच्या मते देशभर राहू काल दुपारी १२:२७ ते दुपारी २: या दरम्यान असणार आहे. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा साजरी करणं योग्य ठरेल. 

जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कधी आहे?

११ ऑगस्ट रोजी सकाळी ६.५४ वाजेपासून अष्टमी सुरू होईल जी १२ ऑगस्टपर्यंत असणार आहे. वास्तविक १२ ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्राला सुरवात होणार आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. म्हणूनच, १२ ऑगस्टला अष्टमी तिथीसोबत रोहिणी नक्षत्र देखील असणार आहे. त्यामुळे शास्त्रातील जाणकारांच्या मते, १२ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं उत्तम आहे.

शैव आणि वैष्णव कोणत्या दिवशी जन्माष्टमी साजरा करतात?

शैव धर्मीय हे  ११ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करतील, कारण शैव धर्मीय हे तिथीनुसार जन्माष्टमी साजरी करतात. म्हणजेच सूर्योदय ज्या तिथीपासून होतो, (म्हणजे उदया तिथी - जेव्हा सूर्य उगवतो)  दुसरीकडे, १२ ऑगस्ट रोजी वैष्णव पंथाचे पालन करणारे लोकं हा उत्सव १२ ऑगस्टला हा साजरा करतील. मथुरा, वृंदावन, द्वारका इत्यादी ठिकाणी १२ ऑगस्टला हा उत्सव साजरा केला जाईल. भगवान कृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता, म्हणून हा समुदाय हा उत्सव १२ ऑगस्ट रोजीच साजरा करेल. तर ओडिशाच्या जगन्नाथ पुरी, वाराणसी आणि उज्जैन येथे साजरी  ११ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. कारण ११ ऑगस्टपासून अष्टमी तिथी सुरु होईल. 

जन्माष्टमीच्या दिवशी पूजा कशी करावी?

या दिवशी भगवान कृष्णाचे मंत्र जप करावे. शक्य असल्यास या दिवशी गीतेचे श्लोक वाचा आणि त्याचे जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करा. रात्री बारा वाजेच्या आधी श्रीकृष्णाची पूजा सुरू करा. भगवान कृष्णाच्या मूर्तीला दूध, दही, मध आणि तूपाने स्नान घाला. शेवटी गंगेच्या पाण्याने शुद्ध स्नान घालावं. त्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसावी आणि त्यानंतर मूर्तीला नवे वस्त्र घाला. शेवटी पंचामृत आणि प्रसादाचे वाटप करा. भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि नंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसाद वाटप करा.

भगवान श्रीकृष्णांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला होता?

हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रातील भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी तिथीमध्ये झाला होता. म्हणूनच दरवर्षी आणि याच नक्षत्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. म्हणून दरवर्षी या तारखेला हा उत्सव साजरा करण्याची परंपरा चालू आहे. या दिवशी मंदिरांव्यतिरिक्त लोक घरात देखील श्रीकृष्णाची पूजा करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी