Ram Navami 2022 : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला.
ग.दि. माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले जाते. माडगुळकरांनी गीत रामायण रचले आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी या गीतांना सुरबद्ध केले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही या गीतांची प्रशंस केली आहे. आज राम नवमी आहे. त्यानिमित्ताने गीत रामायण आवर्जून ऐकले पाहिजे.
फक्त गीत रामायणच नव्हे तर १९९२ साली रामायण ऍनिमेशन स्वरुपात प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात वनराज भाटिया यांनी संगीत दिले होते. यातील सुमिरन करले मनवा, पंचवटी, श्री रघुवरकी वानर सेना ही गाणीही खूप गाजली होती.