Ganesh Chaturthi 2022 Mythology Katha: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) असेही म्हणतात. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्माशी संबंधित प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा गणेश चतुर्थी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी साजरी होणार आहे. हिंदू धार्मिक कथांनुसार गणपती बाप्पाचा (Ganpati Bappa)जन्म भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता. त्यामुळे हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अनेक पौराणिक कथा गणपती बाप्पाशी (Ganpati Bapap Katha) निगडीत आहेत. (listening to story of ganesh chaturthi all your works will be completed know the method of worship ganesh chaturthi 2022 katha)
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीशी संबंधित लोकप्रिय कथा आणि उपासना पद्धती जाणून घ्या. गणेश चतुर्थीच्या पूजेच्या वेळी ही कथा ऐकल्याने व वाचल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकटे दूर होतात.
अधिक वाचा: Tuesday Remedies: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' आहेत Best मार्ग, उजळेल नशीब
गणेश चतुर्थी आख्यायिका
गणपती जन्माशी संबंधित ही कथा सर्वाधिक लोकप्रिय आहे. या आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या काठावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीने शिवाला वेळ घालवण्यासाठी सारीपाट खेळूया असं सांगितले. शंभू महादेवानेही ते मान्य केले. पण सामन्यातील विजय किंवा पराभव कोण ठरवणार? हा प्रश्न होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, भगवान महादेवाने काही पेंढा गोळा केले आणि त्याचा पुतळा बनवला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली. ज्यानंतर त्या पुतळ्याने मुलाचे रुप घेतले. त्यावेळी महादेवाने त्या बालकाला सांगितले की, आम्हाला सारीपाट खेळायचा आहे, पण अडचण अशी आहे की, आमच्या हार-जिताचा निर्णय घेणारा इथे कोणीच नाही, तेव्हा आमच्यापैकी कोण जिंकले आणि कोण हरले हे तुला सांगावे लागेल.
यानंतर माता पार्वती आणि शिव यांच्यात सारीपाटाचा खेळ सुरू झाला. योगायोगाने, माता पार्वतीने खेळात तीनही वेळा विजय मिळवला. खेळाच्या शेवटी, भगवान महादेवाने मुलाला विजय आणि पराभवाचा निकाल सांगण्यास सांगितले. तेव्हा बालकाने महादेवाला विजयी घोषित केलं.
अधिक वाचा: Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थी कधी? जाणून घ्या गणेश पूजनाने कोणते ग्रह होतात शांत
हे ऐकून माता पार्वतीला खूप राग आला आणि रागाच्या भरात तिने मुलाला लंगडा होऊन चिखलात पडण्याचा शाप दिला. माता पार्वतीच्या क्रोधाने तो बालक घाबरला आणि त्याने माता पार्वतीची झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली.
यावेळी बालकाने पार्वती मातेला सांगितले की, अज्ञानातून ही चूक झाली, मी ते जाणूनबुजून केलं नाही. मुलाचे बोलणे ऐकून माता पार्वती भावूक झाल्या आणि तिने मुलाला शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. पार्वती माता म्हणाली, "इथे गणेशाची पूजा करण्यासाठी नागकन्या येतील, त्यांच्या म्हणण्यानुसार तू देखील गणेशाची पूजा करा." असं केल्याने तुम्हाला उ:शाप मिळेल. असे म्हणत माँ पार्वती भगवान शंकरासोबत कैलास पर्वतावर परतल्या.
बरोबर एक वर्षानंतर नागकन्या त्या ठिकाणी आल्या. त्या बालकाने नाग कन्यांना गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची पद्धत विचारली. यानंतर बालकाने 21 दिवस उपवास करून गणेशाची पूजा केली. गणपती बाप्पा मुलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी मुलाला प्रत्यक्ष दर्शन दिले. गणेशजींनी मुलाला इच्छित फळ मागायला सांगितले. मुलगा म्हणाला, हे विनायक, मला एवढी शक्ती दे की मी माझ्या पायावर चालत कैलास पर्वतावर पोहोचू शकेन. गणेशजींनी मुलाला तसे वरदान दिले.
जेव्हा बालक कैलास पर्वतावर पोहोचला तेव्हा शिवाने त्याला विचारले की तू इथे कसा पोहोचलास? यानंतर मुलाने भगवान शंकरांना संपूर्ण कथा सांगितली. मुलाने सांगितले की, माता पार्वतीच्या सांगण्यानुसार मी उपवास केला आणि गणेशाची पूजा केली, त्यामुळे मला हे वरदान मिळाले. सारीपाट खेळण्याच्या दिवशी माता पार्वतीही भोलेनाथांवर रागावली होती. अशा स्थितीत महादेवाने देखील माता पार्वतीची समजूत काढण्यासाठी बालकाने सांगितल्यानुसार २१ दिवसापर्यंत गणपतीचं व्रत केलं. या व्रताच्या प्रभावाने पार्वती मातेच्या मनात भगवान महादेवांबाबत असलेली नाराजी दूर झाली आणि माता पार्वती प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतली.
विघ्नहर्ता गणेशजींची ही कथा सर्व संकटे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. गणेश चतुर्थीला उपवास करून विधीवत पूजा केल्याने भक्तांना गणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो. तसेच या कथेचे पठण व श्रवण केल्याने उपासनेचा व उपवासाचा लाभ होतो.
अधिक वाचा: Vastu Tips for Home: घर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी होईल भरभराट
गणेश चतुर्थी 2022 पूजा- पद्धत
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून मंदिरात दिवा लावावा. या दिवशी शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करा. तुमच्या इच्छेनुसार किंवा संकल्पानुसार दीड दिवसापासून ते 3, 5, 7 किंवा 11 दिवसांपर्यंत गणपतीची मूर्ती घरी बसवा. सर्व प्रथम मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर लाल वस्त्र ठेवून त्यावर श्रीगणेशाची स्थापना करा. गणेशाला फुले, दुर्वा आणि कुंकू अर्पण करा. पूजेत गणपतीला लाडू, मोदक आणि फळे अर्पण करा. गणेशाशी संबंधित व्रत कथा यांचे पठण करा आणि शेवटी श्रीगणेशाची आरती करा.
(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)