Mahashivratri: 'या' राशीच्या व्यक्तींवर होणार श्री शंकराची कृपा, होईल मोठा लाभ

धर्म-कर्म-भविष्य
Updated Feb 09, 2023 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

शंकराचे महापर्व म्हणजे महाशिवरात्री जे 18 फेब्रुवारीला साजरे केले जाते. सनातन धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण उपवास करतात आणि शंकराची पूजा-अर्चा करतात. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने खूप फलदायी ठरते.

It will be the grace of Shankara on shivratri
या राशींच्या लोकांना ही शिवरात्र अगदीचं खास राहणार आहे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शंकराचे महापर्व म्हणजे महाशिवरात्री... 18 फेब्रुवारीला शिवरात्र साजरी केली जाणार आहे
  • ही शिवरात्र अगदीचं खास असणार
  • महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने खूप फलदायी ठरते

Mahashivratri : शंकराचे महापर्व म्हणजे महाशिवरात्री जे 18 फेब्रुवारीला साजरे केले जाते. सनातन धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण उपवास करतात आणि शंकराची पूजा-अर्चा करतात. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने खूप फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊया या शिवरात्रीला कोणत्या राशींच्या व्यक्तींवर शिवकृपा होणार आहे.

मेष राशी 

मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही शिवरात्र अगदीचं खास असणार आहे. या दिवसात तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरीची नवी संधी चालून येण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : Black Cat: काळी मांजर दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

वृषभ राशी 

शंकराच्या कृपेने तुमचं नशीब फळाला येऊ शकतं. तसेचं नोकरीत प्रमोशन होण्याची संधी आहे. तुमची प्रगती होणार आहे. एखाद्याकडे अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळ्यांची साथ मिळेल.

हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे

मिथुन राशी 

या शिवरात्रीत तुम्ही जुन्या आजारातून बरे व्हाल. करिअरमध्ये सुध्दा तुमची भरभराट होणार आहे. घरातील वातावरणही सकारात्मक राहील.

हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट

तूळ राशी 

शिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी