Chaturmas 2022: चार महिन्यांपर्यंत असणार आहे चातुर्मास, या राशीच्या लोकांवर असणार भगवान विष्णूची कृपा

हिंदू धर्मात पंचागानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासाची सुरूवात होते. चातुमार्स कार्तिक माहिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत असतो. चातुर्मासाचा कालावधी चार महिन्याचा असतो. शास्त्रानुसार या चार महिन्यात लग्न, मुंज, साखरपुड्यासारखे कुठलेही शुभ कार्य करता येत नाही. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या चार्तुमासात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. चार महिन्यानंतर भगवान विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि हा चातुर्मासाचा कालावधी संपतो.

lord vishnu
भगवान विष्णू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात पंचागानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासाची सुरूवात होते.
  • चातुमार्स कार्तिक माहिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत असतो.
  • शास्त्रानुसार या चार महिन्यात लग्न, मुंज, साखरपुड्यासारखे कुठलेही शुभ कार्य करता येत नाही.

Chaturmas 2022: हिंदू धर्मात पंचागानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासाची सुरूवात होते. चातुमार्स कार्तिक माहिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत असतो. चातुर्मासाचा कालावधी चार महिन्याचा असतो. शास्त्रानुसार या चार महिन्यात लग्न, मुंज, साखरपुड्यासारखे कुठलेही शुभ कार्य करता येत नाही. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या चार्तुमासात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. चार महिन्यानंतर भगवान विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि हा चातुर्मासाचा कालावधी संपतो. हिंदू पंचागानुसार रविवार १० जुलै पासून चातुर्मास सुरू झाला आहे. चार्तुमासात जर या राशीच्या लोकांनी विष्णूची पुजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. जाणून घेऊया या राशींबद्दल ( Lord Vishnu special grace on these zodiac signs in Chaturmas 2022 news in marathi)

मेष राशींवर असणार भगवान विष्णूची कृपा 

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना चार्तुमासाचा महिना शुभ असणार आहे. चातुर्मासात या चार महिन्यात मेष राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा असणार आहे. चातुर्मासात कुठलेही शुभ करता कामा नये असा प्रघात आहे परंतु मेष राशींच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा असल्याने मेष राशीचे लोक शुभ कार्य करू शकतात.

मिथून राशीच्या लोकांनी गायीला चपाती चारावी 

ज्योतिष शास्त्रानुसार मिथून राशीच्या लोकांचेही पुढील चार महिने चांगले जाणार आहेत. मिथून राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा राहणार आहे. या राशीच्या लोकांची आपल्या क्षेत्रात प्रगती होणार आहे. मिथून राशीच्या लोकांनी चातुर्मासात गरीबांनी दान करावे आणि गायीला चपाती चारावी.

या राशीच्या लोकांनी गाईला चारावे गुळ आणि चपाती

कर्क आणि राशीच्या लोकांवरही भगवान विष्णूची कृपा असणार आहे. चातुर्मासात कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. चातुर्मासात कर्क आणि वृश्चिक राशी असलेल्या लोकांनी गाईला गुळासोबत चपाती चारावी आणि पाणी पाजावे.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठे या माहितीला दुजोरा दिला नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी