Love Marriage : प्रेम विवाहात अडसर ठरतात हे चार ग्रह, ग्रहशांतीसाठी करा हे उपाय

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा तो खास क्षण येतोच. काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही लव्ह मॅरेज येतात. सध्याच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. पण हे लव्ह मॅरेज नेहमीच विना अडथळ्याविना होतीलच असे नाही. जर कुणाच्या प्रेम विवाहात अडथळे येत असतील त्यात ग्रहांचा दोष आहे.

love marriage
प्रेम विवाह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा तो खास क्षण येतोच. काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही लव्ह मॅरेज येतात.
  • सध्याच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे.
  • जर कुणाच्या प्रेम विवाहात अडथळे येत असतील त्यात ग्रहांचा दोष आहे.

Love Marriage Grah Dosh Upay in Marathi : मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा तो खास क्षण येतोच. काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही लव्ह मॅरेज येतात. सध्याच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. पण हे लव्ह मॅरेज नेहमीच विना अडथळ्याविना होतीलच असे नाही. जर कुणाच्या प्रेम विवाहात अडथळे येत असतील त्यात ग्रहांचा दोष आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र, गुरू, बुध आणि राहु कमजोर असल्याने प्रेम विवाहात बाधा येतात. जर कुणाच्या कुंडलीत हे ग्रह कमजोर असतील तर त्याच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक अडथळे येतात.   

ग्रहांची स्थितीमुळे कळे प्रेम विवाह यशस्वी होणार की नाही

व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांछी स्थिती सांगते की त्या व्यक्तीचे प्रेम विवाह यशस्वी होणार की नाही. तसेच वर्तमान काळात ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांचेही उपाय या ग्रहांच्या स्थितीतून लक्षात येतील. कुंडलीत पंचम आणि सप्तम भाव कमजोर असल्याने प्रेम विवाह सफल होण्याची शक्यता कमी होते. या समस्या टाळण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास या समस्या दूर होतील. 

प्रेम विवाहासाठी करा गुरुंचा उपाय

प्रेम विवाह सफल होण्यासाथी शुक्ल पक्षातील गुरूवारी विष्णून्न भगाव आणि लक्ष्मी माताची पुजा करा. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या फोटोंसमोर स्फटिक माळ घेऊन ओम लक्ष्मी नारायण या मंत्राचा जाप करा. प्रेम विवाह सफल होण्यासाठी तीन महिने हा उपाय करा

गुरूवार आणि शुक्रवारी या रंगाचे घाला कपडे

प्रेम विवाहात बाधा येत असतील तर गुरूवारी पिवळ्या तर शुक्रवारी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करा.  


शुक्त्र ग्रहाची करा शांती

प्रेम विवाहातील बाधा दूर करण्यासाठी शुक्त्र ग्रह शांती करा. त्यासाठी शुक्र यंत्राची स्थापना करा आणि या यंत्राची पूजा करा. पूजेच्या वेळी शुक्र बीज मंत्राचा जाप करा. शुक्र ग्रहासंबंधित वस्तु दान करा. शुक्रवारी उपवास करा. तसेच लक्ष्मी मातेची पूजा करून हीरा रत्नाची अंगठी घाला, याने नक्की फरक पडेल. 


सकाळी सुर्याला करा अर्घ्य दान

अशा वेळी कुंडलीतील पंचम भाव आणि सप्तमेश मजबूत करू शकतात. सकाळी सुर्यदेवतेला अर्घ्यदान करा आणि गायत्री मंत्राचा जाप करा. 


    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी