Lunar Eclipse : आज ४ तास चंद्रग्रहण, दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 30, 2020 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज गुरु पौर्णिमा, देव दिवाळी सारखे पवित्र सण देशभर साजरे केले जात आहेत. परंतु या दिवशी म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण दिसेल

Lunar Eclipse
चंद्रग्रहण  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

 • हे चंद्रग्रहण भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये पाहिले जाऊ शकते
 • ३० नोव्हेंबरला चंद्र ग्रहण दुपारी १:०४ ते संध्याकाळी ५:२२ पर्यंत असेल
 • चंद्र ग्रहण हे या विश्वाचे एक अद्भुत दृश्य आहे

आज गुरु पौर्णिमा, देव दिवाळी सारखे पवित्र सण देशभर साजरे केले जात आहेत. परंतु या दिवशी म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये पाहिले जाऊ शकते. ३० नोव्हेंबरला चंद्र ग्रहण दुपारी १:०४ ते संध्याकाळी ५:२२ पर्यंत असेल. या दरम्यान आपण कोणती खबरदारी घ्यावी आणि आपल्या जीवनावर काय परिणाम होईल, या चंद्रग्रहणाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी जाणून घ्या. 

चंद्रग्रहण पाहताना या खबरदारी घ्या

 • चंद्र ग्रहण हे या विश्वाचे एक अद्भुत दृश्य आहे, लोक बरेचदा ते पाहण्यास उत्सुक असतात. परंतु कोणतही ग्रहण पाहण्यापूर्वी आपण नेहमी ही खबरदारी घेतली पाहिजे.
 • धर्मग्रंथानुसार गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये. ग्रहण चालू असताना स्त्रियांनी घराबाहेर पडू नये किंवा खाणे, पिणे, झोपणे यासारखे कोणतेही काम करू नये, त्यांनी या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.
 • असे मानले जाते की ग्रहण काळात ठेवलेले अन्न खाऊ नये. परंतु कधीकधी तेथे बरेच अन्न असते जे आपण टाकून देऊ शकत नाही, म्हणून आपण ग्रहणाच्यावेळी प्रत्येक अन्न किंवा पेयावर तुळशीची पाने घालावी, यामुळे त्यांच्यावर ग्रहणांचा प्रभाव कमी होतो.
 • ग्रहण काळात कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळा. यावेळी, आपण नखे किंवा केस कापू नये. कपडे शिवणे टाळले पाहिजे. 
 • ग्रहण दरम्यान मांस आणि मद्यपान कधीही करू नका कारण त्याचा तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी या दिवशी तुम्ही भगवंताच्या भक्तीत लीन होऊन रामाच्या नावाचा जप करावा.

ग्रहण काळात काय करावे

 • ग्रहण होण्यापूर्वी घरात असलेल्या प्रत्येक खाण्यापिण्यात तुळशीची पाने ठेवा.
 • यावेळी गरीब आणि गरजू लोकांना देणगी द्यावी.
 • ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्याचा तुमच्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
 • ग्रहणाच्यावेळी मंत्रोच्चार करताना गर्भवती महिलांनी देवाची भक्ती करावी.
 • ग्रहणानंतर प्रत्येकाने स्नान केले पाहिजे, अंघोळ केल्याने ग्रहणाचे दोष कमी होतात.
 • ग्रहण सुरू असताना गर्भवती महिलांनी हातात नारळ घेऊन बसले पाहिजे आणि ग्रहणानंतर हे नारळ वाहणार्‍या पाण्यात वाहावे.

चंद्रग्रहण नेमकं काय आहे?

चंद्रग्रहण हा तो क्षण आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते, जेणेकरून सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. धर्मग्रंथानुसार, अनेक भौगोलिक आणि ज्योतिषशास्त्रीय घटना ग्रहणाच्या वेळी घडतात ज्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो. वर्षाचे हे शेवटचे ग्रहण म्हणजे छाया चंद्रग्रहण होय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी