१० जानेवारीला वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, गरोदर महिलांनी घ्या 'ही' काळजी  

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 08, 2020 | 17:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Chandra Grahan: नववर्षातील पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारी २०२० रोजी आहे. ग्रहण काळात गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी असं मानलं जातं.

lunar eclipse chandra grahan 10 january 2020 pregnant woman precaution health marathi news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

 • १० जानेवारी २०२० रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 
 • चंद्रग्रहण ही एक अशुभ घटना असल्याची अनेकांची मान्यता आहे 
 • ग्रहण काळात गरोदर महिलांनी काळी घ्यावी असं म्हटलं जातं
 • ग्रहण काळात जेवण बनवणं हानिकारक असल्याचं बोललं जातं 

१० जानेवारी २०२० रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. या दिवशी पौष पौर्णिमा असल्याने याचं महत्व आणखी वाढलं आहे. हे चंद्रग्रहण १० जानेवारी रोजी रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी सुरु होणार असून रात्री २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. जवळपास चार तास हे ग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारत, यूरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे. 

चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण दोन्ही घटना या खगोलीय घटना आहे आणि प्रत्येक वर्षी घडतच असतात. मात्र, काही नागरिक यावरुन आपले अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात करतात. ग्रहण काळात विशेष काळजी घेण्यात यावी असं म्हटलं जातं. अनेकजण मानतात की, चंद्रग्रहण एक अशुभ घटना आहे आणि त्यामुळे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 

 1. ...म्हणून गरोदर महिलांमध्ये अस्वस्थता 
  असं म्हटलं जातं की, ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घरातून बाहेर पड नये. कारण, ग्रहण काळात शरीरातील हार्मोनलमध्ये बदल होतात ज्यामुळे अस्वस्थता, भीती वाटणे, घाम येणे, थकवा जाणवण्यासारख्या समस्या निर्माण होतात. इतकेच नाही तर काहींना ब्लड प्रेशरची समस्याची जाणवते. 
 2. धारदार वस्तूंपासून रहा दूर 
  ग्रहण काळात गरोदर महिलांनी धारदार वस्तूंचा वापर करु नये. असं म्हटलं जातं की, ग्रहण काळात केवळ गरोदरच महिलांनीच नाही तर तिच्या पतीने सुद्धा धारदार वस्तूंचा वापर करु नये. कारण, धारदार वस्तूंचा वापर केल्याने गर्भवती महिलेच्या बाळाला दुखापत होण्याची शक्यता असते. 
 3. ग्रहण काळात न जेवण्याचा दिला जातो सल्ला 
  असं सांगण्यात येतं की, ग्रहण सुरु असताना बनवण्यात आलेलं जेवण खाणं हानिकारक असतं. गरोदर महिलांनी हे खाणं टाळावे. तसेच तयार जेवणात तुळशीची पानं टाकली तर ते शुद्द राहतं. 
 4. ग्रहण संपल्यानंतर गरोदर महिलांनी तात्काळ आंघोळ करुन घ्यावी. अन्यथा त्याचा परिणाम त्यांच्या होणाऱ्या बाळावर होऊन त्याला त्वचेच्या संबंधी आजार होण्याची शक्यता असते असंही सांगण्यात येतं. 

(टीप: आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, ग्रहण काळात काही गोष्टी न करणं हे चांगलं असल्याची अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी