Maghi Ganesh Jayanti 2023 Invitation Card in Marathi : माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) देखील महाराष्ट्रात भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच अत्यंत उत्साहाच्या वातावरणाता साजरी केली जाते. यंदाची माघी गणेश जयंती 25 जानेवारीला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष आपल्या उत्साही वातावरणामध्ये कोणता साजरा करता आला नाही. पण सारे एकत्र मिळून हा सण समारंभ साजरा करू शकतो आहे. यावर्षी गणेश जयंती निमित्त घरी आलेल्या बाप्पाचं दर्शन ऑनलाइन आणि ऑफलाइन तुम्ही मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तांना देण्यासाठी त्यांना आमंत्रित करू शकणार आहोत. मग त्यासाठी या निमंत्रण पत्रिकांचा मेसेज फॉर्मेट तुमच्या नक्कीच कामी येऊ शकेल. (maghi ganesh jayanti 2023 invitation card format in marathi )
आमंत्रण पत्रिकेचा पहिला फॉरमॅट
सॅम्पल नंबर 1
सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे तरीही आपण शुक्रवार 4 फेब्रुवारी 2022 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी यावं ही विनंती.
ऑनलाईन दर्शनाची लिंक-
वेळ- दुपारी: 12 वाजून 30 मिनिटं
ऑफलाइन - सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 4 ते रात्री 10
आरतीची वेळ : संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं
बाप्पाचे भक्त...
सॅम्पल नंबर 2
गणेश जयंती निमित्त आमच्याकडे विराजमान होणार्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन भेटा आणि आरती मध्येही सहभागी व्हा!
ऑनलाईन दर्शन
वेळ -
तारीख-
आमंत्रित
माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक या सणानिमित्त तीळाच्या सारणाने देखील बनवले जातात. माघी गणेशजयंतीच्या दिवशी दीड दिवस घरी बाप्पाची मूर्ती विराजमान करून त्याची षोडोपचार पूजा करण्याची पद्धत आहे.