Mahashivratri Shri Shankar Puja upay for marriage: महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. महाशिवरात्री संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. भाविक शंकराच्या मंदिरात पूजा-अर्चा करतात, उपवास करतात. अशी मान्यता आहे की, भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. जर एखाद्या मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा हवा तसा जोडीदार मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतील. जाणून घ्या कोणते आहेत हे उपाय आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी शंकर-पार्वती यांची कशा प्रकारे करावी पूजा.
ज्या मुलींचे लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. भगवान शंकर आणि पार्वती यांना झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करुन पूजा करावी. त्यानंतर ओम गौरी शंकराय नम: या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यास आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्याची इच्छा पूर्ण होईल.
हे पण वाचा : Sapna Gill: पृथ्वी शॉ सोबत वाद झालेली सपना गिल नेमकी कोण?
ज्या मुलींचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि त्यांना वाटते की, त्यांना उत्तम जोडीदार मिळावा. त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी अंघोळ करुन शिवलिंगावर जल अर्पण करावे. तसेच 'ओम पार्वती पतये नम:' या मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने मनासारखा जोडीदार मिळण्याची इच्छा पूर्ण होईल.
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् घोरण्याची समस्या करा दूर
जर एखाद्या मुलीचे वय जास्त असेल आणि कुटुंबीय लग्नासाठी मुलगा शोधून-शोधून थकले असतील तर त्या मुलीने महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. ज्या मुलीने हा उपाय केला त्या मुलीवर भगवान शंकर आणि पार्वती प्रसन्न होतात. या मुलींना हवा तसा जोडीदार मिळतो.
हे पण वाचा : Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा
जर एखाद्या मुलीला प्रेम विवाह करायचा असेल मात्र, कुटुंबीय तयार नसतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करुन भगवान शंकराचाी पूजा करावी. माता पार्वतीच्या फोटो, मूर्ती समोर बसून रामायणताली 'तौ भगवानु सकल उर बासी | करिही मोहि रघुबर कै दासी || जेहि कें जेहि पर सत्य सनेहू | सो तेहि मिलइ न कछु संदेहू ||' याचा जप करावा. असे केल्याने प्रेम विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)