Mahashivratri 2023 Vrat Puja Vidhi In Marathi: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नका, अन्यथा...

Mahashivratri 2023 Upay In Marathi : महाशिवरात्री संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात आणि या दिवशी उपवास सुद्धा करतात. 

Mahashivratri 2023 never offer these things to lord shiva shivling read in marathi
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नका, अन्यथा... (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री
  • निशीथकाल उ. रात्री 00.27 पासून उ. रात्री 01.17 पर्यंत, नक्षत्र - उत्तराषाढा 17.42, योग - व्यतिपात 19.36
  • सूर्योदय सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी तर चंद्रोदय सायंकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी

Mahashivratri 2023 Vrat Puja Vidhi In Marathi: यंदाच्या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपंन्न झाला होता. असे मानले जाते की, या दिवशी व्रत, उपवास करुन मनोभावे पूजा-अर्चा केल्याने आयुष्यातील समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. इतकेच नाही तर दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या दिवशी भाविक महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. श्री शंकराला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये भांग, बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण केली जातात. मात्र, शास्त्रात अशा काही गोष्टींची माहिती देण्यात आली आहे ज्या भगवान शंकराची पूजा करताना वापरु नयेत. कारण, तसे केले तर भगवान शंकर नाराज होऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या आहेत या वस्तू ज्यांचा भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही वापरु नयेत. (Mahashivratri 2023 never offer these things to lord shiva shivling read in marathi)

हळद

हळदीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. हळद ही स्त्रीशी संबंधित आहे आणि शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच शिवलिंगावर हळद अर्पण करू नयेत.

हे पण वाचा : Sapna Gill: पृथ्वी शॉ सोबत वाद झालेली सपना गिल नेमकी कोण?

सिंदूर, कुंकू

शिवलिंगावर सिंदूर किंवा कुंकू लावत नाहीत. शंकराला विनाशाची देवता मानले जाते. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सिंदूर, कुंकू लावतात. त्यामुळेच भगवान शंकराला सिंदूर किंवा कुंकू अर्पण करणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी शंकराला चंदनाचे तिलक, टिळा लावणे शुभ मानले जाते.

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् घोरण्याची समस्या करा दूर

तुळस

भगवान शंकराच्या पूजेत तुळशीचा वापर करण्यात येत नाही. शिवपुरानानुसार, जालंदर याला भगवान शंकराने मारले होते आणि तुळशी पूर्वी जालंदरची पत्नी वृंदाच्या रुपात होती. जालंदरला मारल्याने वृंदा दु:खी झाली आणि वृंदा नंतर तुळशीचं रोपटं बनली आणि भगवान शिवाला त्यांच्या दैवी गुणांपासून वंचित केले. त्यामुळे शिवलिंगावर तुळस अर्पण करत नाही.

हे पण वाचा : या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी

शंख

पौराणिक कथेनुसार, भगवान शिव शंकर यांनी शंखचूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. शंख हे त्या राक्षसाचे प्रतीक मानजे जाते जो भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे भगवान शिव यांच्या पूजेत शंख निषिद्ध मानला जातो. 

हे पण वाचा : Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा

अशा प्रकारची फुले

शास्त्रानुसार, शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नये. तसेच कनेर आणि कमळही अर्पण करु नये. शिवलिंगावर लाल लंगाची फुलेही अर्पण करत नाहीत. शिव शंकराला केवळ पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी