Mahashivratri Fasting Food Tips in marathi: भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्री खूपच महत्त्वपूर्ण असते. या दिवशी भाविक भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. शिवलिंगावर अभिषेक करतात. शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आवडीचे पदार्थ, फूल अर्पण करतात. तसेच उपवास सुद्धा करतात. काहीजण प्रथमच शिवरात्रीचा उपवास करत असतील अशा स्थितीत तुम्हाला माहिती हवं की उपवासाची सुरुवात कशी करावी.
काही दिवस पूर्ण दिवस उपवास करतात आणि केवळ रात्रीच्या वेळी जेवतात. तर काहीजण फळे, उपवासाचे पदार्थ खातात. तुम्ही प्रथमच उपवास करत असाल तर हे व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या हा उपवास कसा सुरू करावा.
हे पण वाचा : 7 दिवसात मिळवा सिक्स पॅक अॅब्स, बेडवर करु शकता हे 5 व्यायाम
महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त 18 फेब्रुवारी रात्री 12.09 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत आहे. याच्या व्यतिरिक्त सूर्योदयापूर्वी पूर्ण दिवस महाशिवरात्रीची पूजा करु शकता.
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् घोरण्याची समस्या करा दूर
हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या
पेय : उपवासाच्या दिवशी शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी ज्युस, स्मूदी, लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊ शकता.
ड्रायफ्रूट्स : उपवास करत असल्यास ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
भाज्या : उपवासाच्या दिवशी अनेकजण बटाटा, भोपळा यापासून तयार केलेल्या भाज्या सुद्धा खाऊ शकता. या भाज्यांना सात्विक आहार मानले गेले आहे.
फळे : उपवासाच्या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता. केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब यासारखी फळे खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला एक ऊर्जा मिळेल.
अन्न : उपवासाच्या दिवशी बहुतेकजण अन्न खात नाही. त्याऐवजी शिंगाड्याच्या पीठापासून पुरी बनवून खाऊ शकता. या पीठापासून पुरी बनवणं थोडं कठीण आहे. त्यामुळे या पीठात उकडलेले बटाटे घालून पुरी पराठे बनवू शकता.