Makar Sankranti 2021: मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Makar Sankranti 2021: नव्या वर्षाच्या आगमनानंतर आता पहिलावहिला सण (मकरसंक्रांत) आज (गुरुवार) साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने आपणही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

makar sankranti 2021
मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छा, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Makar Sankranti 2021 whatsApp Marathi wishes and Messages: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी (Makar Sankranti 2021) सज्ज झाले आहेत. आज (१४ जानेवारी २०२१) मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी आपल्याला अनेक सण मनासारखे साजरे करता आले नाही. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. पण असं असलं तरीही आपल्या सर्वांवा सजग राहूनच सर्व सण-समारंभ साजरे करावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला काही नियम नक्कीच पाळावे लागणार आहेत. कोरोना संकट असल्यामुळे अद्यापही आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण मकरसंक्रांत नक्कीच साजरी करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून मंगलकार्यांना सुरुवात होते. पवित्र नदीत स्नान करण्यापासून ते दानपुण्याचेही यादिवशी विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते.  असे मानले जाते 

मात्र असं असलं तरीही कोरोनामुळे आपण मकरसंक्रांतीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Makar Sankranti 2021 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti 2021) खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकरसंक्रांत निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड बोला...

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... 

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

तिळगूळ घ्या गोड गोड बोला...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकरसंक्रातीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगूळ घ्या गोडगोड बोला ..

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मकरसंक्रांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृद्धीची व भरभराटिची जावो.

मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी