Mangalagaur Marathi Wishes : मुंबई : शंकराचा प्रिय महिना हा श्रावण महिना मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. हे व्रत भोलेनाथ यांची पत्नी पार्वती देवीसाठी केले जाते. हे व्रत लग्न झालेल्या महिला आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी तसेच त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी ठेवतात. तसेच ज्या दाम्पत्याला संतान सुख मिळत नाही आहे त्या महिलांनाही या व्रताचा लाभ होतो. तर एखादी कुमारिका हे व्रत करत असेल तर तिच्या लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत करताना श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी सकाळी लवकर उठून नवे कपडे परिधान करून मंगळागौरी म्हणजेच देवी पार्वतीच्या मूर्तीसमोर बसून विधिवत पुजा करावी. मंगळागौरी पुजनाच्या मराठीतून शुभेच्छा द्या.
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्नावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा
हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा
श्रावणामध्ये येते, सुंदर श्रावणधारा
चला ग सख्यांनो
मंगळागौरी पुजन आहे घरा
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा
फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा
श्रावण आला, घेऊन सोबत मंगळागौरी
हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी
रुसून बसलेली यादव राणी
सखी संघात गाते मधूर श्रावणगाणी
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा