Mangalagaur 2022: श्रावणातील या चार तारखा मंगळागौर पूजनासाठी महत्त्वाच्या

Mangla gauri vrat 2022: श्रावण महिन्यातील दर मंळवारी मंगळागौरीचे व्रत करून आनंद साजरा केला जातो. असं म्हणतात की, नवविवाहित महिला लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत करतात.

 Mangala Gauri Puja 2022 Dates
मंगळागौर पूजा 2022   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • ऑगस्ट (August) महिना सुरू होताच व्रत आणि सणांची रेलचेल सुरू होते.
  • मंगळागौरी (Mangalagaur), पुत्रदा (Putrada) आणि भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi), भारताचा स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे महत्वाचे सण साजरे होणार आहेत.
  • हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व असतं. हा महिना खूप पवित्र मानला जातो.

मुंबई: Mangala Gauri Puja 2022 Dates:ऑगस्ट (August) महिना सुरू होताच व्रत आणि सणांची रेलचेल सुरू होते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण (festivals begins)  येत असतात. यंदा ही महिन्याची सुरुवात नागपंचमीपासून (Nagpanchami)  होणार आहे. यासोबतच मंगळागौरी  (Mangalagaur),  पुत्रदा (Putrada) आणि भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi), भारताचा स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे महत्वाचे सण साजरे होणार आहेत. श्रावण महिन्यातील दर मंळवारी मंगळागौरीचे व्रत करून आनंद साजरा केला जातो. असं म्हणतात की, नवविवाहित महिला लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत करतात.

कशी साजरी करतात मंगळागौरी 

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व असतं. हा महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात दर मंगळवारी मंगळगौर साजरी केली जाते. यावेळी पूजनाचा घाट घातला जातो. मंगळागौरीचं (Mangala Gauri) नवविवाहित महिलांमध्ये वेगळीच क्रेझ असते. नवीन लग्न झाल्यानंतर 5 वर्ष ही मंगळगौर खेळण्याची प्रथा असते, असं म्हटलं जातं. मंगळागौरच्या दिवशी सार्‍या महिला एकत्र जमतात आणि रात्र जागवतात. रात्र जागवून खेळ खेळण्याची प्रथा असते.

अधिक वाचा-  High BP च्या रूग्णांसाठी 'ही' खास रेसिपी 

यंदा मंगळागौरी पूजनाचे (Mangala Gauri Puja) कोणकोणते दिवस आहेत ते जाणून घेऊया. 

यंदाच्या श्रावण महिन्यात यंदा पहिली मंगळागौर पूजा 2 ऑगस्ट दिवशी असणार आहे. त्यानंतर 9 ऑगस्ट,16 ऑगस्ट  आणि 23 ऑगस्ट दिवशी मंगळागौर पूजन केले जाणार आहे.

खेळ खेळण्याची प्रथा 

मंगळागौरच्या पूजनावेळी आपले नातेमंडळी, शेजारी, आजूबाजूच्या ओळखीतील स्त्री, मुलांना बोलावलं जातं. त्यानंतर पूजा करून फुगडी, बसफुगडी,  झिम्मा असे विविध पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जाते असं म्हणतात. 

या दिवशी देवी पार्वतीची पुजा करतात. अखंड सौभाग्य आणि सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी यासाठी रात्रभर जागून हे व्रत केलं जातं. नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावं, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईनं मुलीला दिलेले  सौभाग्य व्रत  म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व असल्याचं म्हटलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी