Mangal Gochar:२७ जूनपासून ४४ दिवस या राशींवर मेहरबान असणार मंगळ, छप्परफाड पैसा

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 17, 2022 | 15:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mangal Gochar:जूनमध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात मंगळ ग्रहाचाही समावेश आहे. २७ जूनला मंगळ आपली रास मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे अनेक राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. 

astrology
२७ जूनपासून ४४ दिवस ३ राशींवर मेहरबान असेल मंगळ 
थोडं पण कामाचं
  • मेष रास राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ गोचर शुभदायक ठरणार आहे.
  • ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरणार आहे.

मुंबई: मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. मंगळ ग्रह २७ जूनपासून आपली रास मेषमध्ये प्रवेश करत आहेत. मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. मात्र काही राशींना याचा जबरदस्त लाभ होणार आहे. १० ऑगस्ट पर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे आणि काही राशींना या दरम्यान जबरदस्त धनलाभ होणार आहे. मंगळाचे मेष आणि वृश्चिक राशवर अधिपत्य आहे. 

अधिक वाचा - पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरतीः सुभाष देसाई

या राशींना होणार मंगळ गोचरचा लाभ

मेष रास

या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ गोचर शुभदायक ठरणार आहे. या कालावधीत करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. जर तुम्ही भागीदारीत एखादे काम करत आहात तर यादरम्यान तुम्ही चांगला फायदा मिळवाल. मंगळाचे हे गोचर नोकरीपेशा लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तर लव्ह लाईफमध्ये चांगले संकेत दिसत आहेत. 

मिथुन रास

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरणार आहे. नोकरीत लाभ होतील. कमाईचे अनेक मार्ग खुले होती. इन्कममध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा सुधारेल. या दरम्यान पदोन्नतीचे अधिक चान्सेस आहेत. 

अधिक वाचा - ५० घोडे आणि १ हजार माणसांना मागे टाकत जिंकली ३५ किमीची शर्यत

सिंह रास 

या दरम्यान व्यक्तीला नोकरी आणि बिझनेस दोन्हीमध्ये यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. इन्कममध्ये चांगली वाढ होऊ शकते. अनेक ठिकाणांहून पैसा हाती येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी