Night Dream: रात्री तुम्हालाही 'तसे' स्वप्न पडतात... या स्वप्नांचा अर्थ आणि लक्षणे काय?

Dreams meaning: रात्री झोपेत अनेकांना स्वप्न पडत असतात. स्वप्न पाहून काहीजण तर अचानक जागे होतात तर काहींना आपल्याला नेमकं काय स्वप्न पडलं हेच लक्षात राहत नाही.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला पडणारी स्वप्ने ही भविष्यातील घटना दर्शवतात
  • स्वप्न शास्त्रानुसार, कोणत्याही कारणाशिवाय स्वप्ने पडत नाहीत
  • अनेकांना स्वप्न पडते की, आपण एखाद्या उंचीवरुन खाली पडत आहोत

Meaning of dreams swapna: स्वप्न शास्त्रानुसार, कोणतेही स्वप्न हे विनाकारण नसते तर त्याचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्न ही भविष्यातील घटना दर्शवतात असं म्हटलं जातं. उंचावरून खाली पडण्याचे स्वप्न अनेकांना पडतात मात्र, या स्वप्नाचा अर्थ नेमका काय? (meaning of dreams know when you saw a dream in which you are falling from a height)

स्वप्नात उंचीवरून पडण्याचे संकेत :

प्रत्येक व्यक्ती झोपेत स्वप्न पाहतो. काहींना झोपेतून उठल्यावर स्वप्ने आठवतात, तर काहींना झोपेतून उठल्यावर स्वप्ने आठवत नाहीत. स्वप्न शास्त्रानुसार, कोणतेही स्वप्न विनाकारण नसून ते भविष्यातील घटनांशी निगडीत असते. कधी स्वप्ने ही भविष्यातील घटनांच्या संदर्भातील भाकीत असतात तर कधी ती आपल्या मेंदूत सुरू असलेल्या भूतकाळातील घटनांचे संकलन असतात. 

स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नात शुभ आणि वाईट असे संकत असतात. कधीकधी स्वप्नात तुम्ही स्वत:ला उंचावरून खाली पडताना पाहता. अशी स्वप्ने देखील विनाकारण पडत नाहीत. पण अशी स्वप्ने भविष्यातील घटना दर्शवतात.

अधिक वाचा : Astro tips: य़ावेळेस तुम्ही झोपलात तर लक्ष्मी माता होऊ शकते नाराज, वाढते नकारात्मकता

तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? 

झोपल्यानंतर स्वप्ने पाहणे ही एक सामान्य क्रिया आहे. स्वप्नात स्वत:ला उडताना पाहणे, ढगांमध्ये तरंगताना, आकाशातून उडी मारताना, एखाद्या फिल्मी सुपरहिरोसारखे उडताना पाहणे, उंच इमारतीवरुन पडताना पाहणे. मात्र, स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात उडणे किंवा उंचावरुन पडणे अशा स्वप्नांचा वेगळा परिणाम होतो.

अधिक वाचा : Kitchen Vastu Tips: घराच्या सुखासाठी असे असावे स्वयंपाक घर

स्वत:ची विशेष काळजी

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला उंचावरुन पडताना पाहत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. अशी स्वप्ने तुमची मानसिक आणि शारीरिक थकवा दर्शवतात. अशा प्रकारची स्वप्ने सूचित करतात की, तुम्हाला पुरेशा झोपेची आवश्यकता आहे. जेणेकरून तुम्ही दुर्घटनेपासून वाचू शकता.

अधिक वाचा : सोपे उपाय करा; पैसे, नोकरी, कुटुंबाशी संबंधित समस्या सुटताना बघा

आवश्यक बदलांचे संकेत 

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वत:ला उंचावरुन वेगाने खाली पडताना स्वप्नात पाहत असाल तर त्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. दुसरीकडे जर तुम्ही स्वत:ला आकाशातून किंवा उंचावरुन हळूहळू खाली पडताना पाहिलं तर त्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही काही नवी बदल करण्याचा विचार करत आहात आणि हा बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतो. उंचावरुन पडण्याचे स्वप्न पाहताना तुमचे डोळे उघडले तर त्याचा अर्थ तुम्ही एक अलर्ट व्यक्ती आहात.

उत्पन्नात घट होण्याचे संकेत

स्वप्न शास्त्रानुसार, जर व्यापाराशी संबंधित व्यक्तीने स्वत:ला एखाद्या उंचावरुन खाली पडतानाचे स्वप्न पाहिले तर त्याचे उत्पन्न कमी होण्याचे हे संकेत असू शकते. जर घरगुती महिलांना अशा प्रकारची स्वप्न पडली तर त्याचा अर्थ होतो की, तिच्या पतीच्या उत्पन्नात घट होऊ शकते. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर देण्यात आला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताचं समर्थन करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी