शरीराच्या या भागावर तीळ असल्यास मिळेल संतानसुख तसेच धनलाभ

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 09, 2019 | 17:11 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ज्योतिषशास्त्रानुसार शरीरावर तीळ असणे ही सामान्य गोष्ट आगे. मात्र शरीरावरील काही ठिकाणी असलेले तीळ काही संकेत देतात. यासोबतच तुमचे भाग्य आणि भविष्याबाबत माहिती देतात. जाणून घ्या हे तीळ काय संकेत देतात.

moles
तीळ 

थोडं पण कामाचं

 • ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्रात तिळाचे महत्त्व
 • नाकावर तीळ असलेल्या महिला भाग्यवान
 • गालावर तीळ असल्यास जीवन संघर्षपूर्ण

मुंबई: शरीराच्या विविध भागांवर तीळ असतात. काही तीळ हे जन्मापासून असतात तर काही तीळ वयासोबत दिसू लागतात. या तिळांच्या मागेही एक कहाणी आहे. हे तीळ शरीराच्या काही खास भागांवर असल्यास ते भविष्य तसेच आपल्या व्यक्तिमत्वाबाबत बरीच माहिती देतात. समुद्रशास्त्रच नव्हे तर ज्योतिष शास्त्रही या तिळांबाबत बरीच माहिती दर्शवतात. अनेकदा हे तीळ आपले सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. चेहरा, डोळे, नाक अथवा मानेवर तसेच अन्य भागांवर तीळ असल्यास काय होते घ्या जाणून...

शरीराच्या या भागांवर काळा तीळ असल्यास मिळेल संतानसुख तसेच धनलाभ

 1. जर तुमच्या कमरेवर तीळ आहे तर याचा अर्थ तुमच्या जीवनात मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करताना मोठे कष्ट घ्यावे लागतील. 
 2. जर पोटावर तीळ असेल तर तुम्ही फूडी आहात. तुम्हाला चांगले खाण्याचा शौकल असेल तसेच तुम्ही खाण्यावर अधिक खर्चही करत असाल. 
 3. एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर तीळ असल्यास ती व्यक्ती एका ठिकाणी न टिकणारी असते. या व्यक्ती भरपूर प्रवास करतात. 
 4. जर तुमच्या पायाच्या तळव्यावर तीळ आहे अथवा अंगठ्याच्या खाली तीळ असल्यास तुम्ही सतत चालणार असाल. म्हणजेच तुमच्या आयुष्यात केवळ देशातच नव्हे तर परदेशातील प्रवासाचेही अनेक योग आहेत. 
 5. नाकावर तीळ असण्याचा अर्थ अशा व्यक्ती थोड्या गर्विष्ठ अशतात. मात्र तुम्ही खूप प्रवास करणारे असाल. तुम्ही परदेश प्रवास करतील. ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो अशा महिला सौभाग्यशाली मानल्या जातात. 
 6. कपाळावर तीळ असल्यास या व्यक्तींना समाजात मोठा सन्मान मिळतो. आदर मिळतो. जर कपाळावर तीळ हा डाव्या बाजूस असेल तर ती व्यक्ती खूप श्रीमंत असल्याचे संकेत असतात. जर दोन आयब्रोजच्या मध्ये तीळ असेल तर अशा व्यक्ती आपल्या घरापासून दूर अर्थात परदेशात प्रवास करतात. 
 1. ओठांवर ज्यांचा तीळ असतो त्या व्यक्ती प्रेमळ स्वभावाच्या असतात. मात्र तीळ ओठांच्या खाली असेल तर यामुळे खिसा खाली होण्याचे संकेत असतात. 
 2. जर तुमच्या गालावर तीळ असेल तर तुमचे जीवन संघर्षमय असते. जर हा तीळ उजव्या गालावर असेल तर तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते. 
 3. ज्या व्यक्तींच्या डोळ्यामध्ये तीळ असतो अशा व्यक्ती खूप भावनात्मक असतात. उजव्या डोळ्यामध्ये तीळ असणे उच्च विचारांचे असल्याचे संकेत देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शरीराच्या या भागावर तीळ असल्यास मिळेल संतानसुख तसेच धनलाभ Description: ज्योतिषशास्त्रानुसार शरीरावर तीळ असणे ही सामान्य गोष्ट आगे. मात्र शरीरावरील काही ठिकाणी असलेले तीळ काही संकेत देतात. यासोबतच तुमचे भाग्य आणि भविष्याबाबत माहिती देतात. जाणून घ्या हे तीळ काय संकेत देतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola