12 May 2022 Grah and Yoga : नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात विविध राशी आणि ग्रहांची स्थिती यांचा अभ्यास केला जातो. ग्रहांचा विविध राशींवर पडणार प्रभाव आणि त्याचे परिणाम याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. वर्षातील प्रत्येक महिना आणि दिवसाचे विशिष्ट महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार असते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून महिन्याची 12 तारीख अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी अनेक महत्त्वाचे योगायोग तयार होत आहेत. त्यामुळे या दिवशी पूजेचे फळ अनेक पटींनी वाढते. या दिवशी एकादशीही येते. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. (Month of May 2022 will be lucky for these zodiac signs, check details)
अधिक वाचा : Shukra Gochar 2022 | पुढील 20 दिवस या राशीच्या लोकांवर होणार धनवर्षा...शुक्र ग्रह पाडणार पैशांचा पाऊस!
12 मे 2022, गुरुवार ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी विशेष धार्मिक कार्य करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. सर्व तिथींमध्ये एकादशी तिथी सर्वश्रेष्ठ मानली जाते. पौराणिक कथेनुसार, राक्षसांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते.
12 मे रोजी मोहिनी एकादशी आहे. हा दिवस गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णूसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गुरुवारी एकादशी येत असल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढत आहे.
अधिक वाचा : Vastu Tips:तुम्हाला सतत पैशाची तंगी सतावतेय का? दूर करतील या टिप्स
हिंदू कॅलेंडरनुसार 12 मे रोजी अनेक विशेष योगायोग घडत आहेत. या दिवशी एकादशीसोबतच उत्तरा फाल्गुनी नक्षत्रही असेल. यासोबतच या दिवशी हर्षण योगही तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हर्ष योगात केलेल्या कामात यश मिळते.
12 मे रोजी ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, या दिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. मोहिनी एकादशीच्या दिवशी दोन ग्रह आपल्या राशीत भ्रमण करतील. शनी कुंभ राशीत राहील आणि गुरु आपल्या राशीत मीन राशीत विराजमान असेल. हे दोन्ही ग्रह राशीला राजयोगाप्रमाणे फळ देतील. तूळ, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी मे महिना लाभदायक ठरेल.
शुक्राचे हे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ आहे. शुक्र 23 मे पर्यंत मीन राशीत राहील आणि या काळात 3 राशीच्या लोकांवर खूप दयाळू असेल. या लोकांना खूप पैसा मिळेल आणि खूप आनंद मिळेल. पाहूया या तीन राशी कोणत्या आहेत आणि या राशींच्या लोकांचा काय फायदा होणार आहे. वृषभ, मिथून, कर्क या तीन राशी आहेत ज्यांना मोठा लाभ होणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत असेलच असे नाही.)