Numerology : अंक ज्योतिषानुसार २०२२मध्ये ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, तुमची तर यात नाही ना

धर्म-कर्म-भविष्य
Updated Dec 27, 2021 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology 2022: ज्या व्यक्तींचा मूलांक २ आणि ६ आहे अशा व्यक्तींसाठी २०२२ हे वर्ष खूपच चांगले आणि फलदायी जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची रखडलेली कामे होतील.

numerology
२०२२मध्ये ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब 
थोडं पण कामाचं
  • वर्ष २०२२मध्ये अंकांचे एकूण योग ६ असेल.
  • वर्ष २०२२मध्ये नंबर २ तीन वेळा येत आहे त्यामुळे हे वर्ष चंद्राने प्रभावित असलेल्या मुलांक २ च्या व्यक्तींसाठीही महत्त्वाचा असेल.
  • नोकरी करणाऱ्यांसाठी या वर्षात मनासारखी कामे होतील.

मुंबई: भविष्य(horoscope) जाणून घेण्याची एक पद्धत म्हणजे अंकशास्त्र(numerology) असते. या ज्योतिष विद्येमध्ये अंकांच्या आधारवर येणाऱ्या नशीबाबाबत भविष्यवाणी केली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या व्यक्तींना २०२२ हे वर्ष सगळ्यात खास जाणार आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींच्या करिअरमध्ये(career) जबरदस्त यश मिळणार आहे. तसेच या व्यक्तींची अनेक कामे होणार आहेत. moolank 2 and 6 peoples will get more benefit in year 2022

वर्ष २०२२मध्ये अंकांचे एकूण योग ६ असेल. अंक ६ भौतिक सुखांचा कारक शुक्र ग्रह मानला जातो. यासाठी हे वर्ष मूलांक ६ असलेल्या व्यक्तींसाठी खास असणार आहे. याशिवाय वर्ष २०२२मध्ये नंबर २ तीन वेळा येत आहे त्यामुळे हे वर्ष चंद्राने प्रभावित असलेल्या मुलांक २ च्या व्यक्तींसाठीही महत्त्वाचा असेल. या वर्षे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २,११, २० आणि २९ या तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक २ असतो. तसेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यातील ६,१५,२४ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ६ असेल. य़ा दोनही मूलांक असलेल्या लोकांसाठी नवे वर्ष गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगले असणार आहे. 

नोकरी करणाऱ्यांसाठी या वर्षात मनासारखी कामे होतील. यश मिळेल.  प्रत्येक कामात सफलता मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. वर्षातील मध्य कालावधी या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. या वर्षात धनलाभाचे अनेक योग आहेत. सोबतच पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचत करण्यातही सफल व्हाल. 

ज्यांची जन्मतारीख २, ११, २० आणि २९ इतकी आहे त्यांचा मूलांक २ असतो. २०२२ हे वर्ष २ मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगले जाणारे असणार आहे. युवकांना या वर्षात कला, साहित्य, मीडिया अथवा संगीत क्षेत्राशी जोडलेले असतील त्यांना यश मिळू शकते. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल. लेखन क्षेत्रातील कार्यरत लोकांना यश पुढील पायरीवर नेईल. एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. ज्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी नवीन संधी चालून येतील. आईचे आरोग्य सुधारेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी