Vastu Shastra: पूजा करताना करा 'या' रंगाच्या अक्षतांचा समावेश, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

Worship Vastu Tips: हिंदू धर्मात अक्षता किंवा तांदळाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की तांदूळ ही पृथ्वीवर प्रथम लागवड केली गेली होती, म्हणून तांदूळ हे पहिले धान्य मानलं जातं. हिंदू धर्मात कोणत्याही देवतांची पूजा करताना पिवळा तांदूळ नक्कीच वापरला जातो.

Vastu Shastra
पूजा करताना करा पिवळ्या अक्षतांचा करा समावेश, मानलं जातं शुभ 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात (Hinduism) पूजेला विशेष महत्त्व आहे.
  • हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला तांदूळ अर्पण करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी अक्षता नंतर तांदूळ अर्पण करणे महत्वाचे आणि शुभ मानले जाते.
  • हिंदू धर्मात अक्षता आणि तांदूळ हे सर्वात शुभ मानले जातात. तांदूळ हे सर्वात शुद्ध धान्य आहे.

नवी दिल्ली:  Yellow Rice Benefits In Vastu: हिंदू धर्मात (Hinduism) पूजेला विशेष महत्त्व आहे. कोणतंही शुभ, मंगल कार्य आणि पूजा करताना तांदूळ (Rice)  किंवा अक्षता  (Akshata) आणि टिळ्याशिवाय अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मात पूजेदरम्यान तांदूळ किंवा अक्षता अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. हिंदू पुराणात पूजेत तांदूळ अर्पण केल्याचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला तांदूळ अर्पण करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी अक्षता नंतर तांदूळ अर्पण करणे महत्वाचे आणि शुभ मानले जाते. त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात अक्षता आणि तांदूळ हे सर्वात शुभ मानले जातात. तांदूळ हे सर्वात शुद्ध धान्य आहे. तांदूळ पिवळा कसा बनवायचा आणि पूजेदरम्यान पिवळ्या तांदळाचा समावेश करणे यासारख्या गोष्टी जाणून घेऊया.

तांदूळ पिवळा कसा बनवायचा

तांदूळ पिवळा करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यासाठी थोडी हळद घेऊन त्यात थोडे पाणी घालावे. आता भिजवलेल्या हळदीत तांदळाचे दाणे टाका. यानंतर तांदूळ हळदीमध्ये चांगले रंगू द्या. तांदूळ पूर्णपणे रंगला की कोरडा होऊ द्या. अशा प्रकारे तांदूळ पिवळा होईल आणि पूजेमध्ये वापरता येईल.

ज्योतिष शास्त्रानुसार पिवळ्या तांदळाने देवता प्रसन्न होतात. पिवळा तांदूळ कोणत्याही कामात देवदेवतांना आमंत्रण देण्यासाठी वापरतात. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

सगळ्यामध्ये तांदूळ सर्वोत्तम आणि शुद्ध मानला जातो. पांढऱ्या तांदळाचा रंग शांततेचे प्रतीक आहे. तांदूळ हे पहिले धान्य मानले जाते, कारण तांदूळ ही पृथ्वीवर प्रथमच पिकवली गेली होती. अक्षता म्हणजे तांदूळ सर्व देवतांना अर्पण केला जातो. सनातन धर्मात अक्षता किंवा पिवळ्या तांदळाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. अर्पण करताना अक्षता किंवा पिवळा तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्या. तुटलेला तांदूळ अशुभ मानला जातो.

अधिक वाचा-  स्वातंत्र्यदिनी बनवा टेस्टी तिरंगी ढोकळा, जाणून घ्या सोपी रेसिपी

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि साहित्यावर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी