Nag Panchami 2019: १२५ वर्षानंतर नागपंचमीच्या दिवशी येतोय शुभ योग

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 31, 2019 | 17:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

श्रावणातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा सण येत आहे. यावेळी नागपंचमीचा सण १२५ वर्षांनंतर सोमवारच्या दिवशी येत आहे. त्यामुळे या शुभ योगाचे दुहेरी फायदे होणार आहेत.

naagpanchami
नागपंचमी 

थोडं पण कामाचं

  • श्रावणातील पहिल्याच सोमवारी नागपंचमी
  • १२५ दिवसानंतर येतोय हा योग
  • या दिवशी नागाची पुजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती

मुंबई: शिव शंकराचा प्रिय महिना श्रावण मानला जातो. या महिन्यात अनेक उपवास येत असतात. श्रावणाचा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. ऑगस्टमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. श्रावणाच्या महिन्यातील सोमवार हे पवित्र असतात. या दिवशी अनेक जण सोमवारचा उपवास करतात. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला हे सण येतात. नागपंचमीच्या दिवशी नागाची पुजा केली जाते. 

या दिवशी नागाची पुजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. नागदेवतेची पुजा केल्याने महादेव प्रसन्न होतात. नागाला शिव महादेवाच्या आभूषणांपैकी एक मानले जाते. यंदा श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा सण येत आहे. यावर्षी मोठा शुभ योग आहे. यावेळी नागपंचमी हा सण सोमवारच्या दिवशी येत आहे. तब्बल १२५ दिवसानंतर हा योग येत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. संयोगासोबत या दिवशी यायीजयद योगासोबत हस्त नक्षत्रही आहे. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागदेवाची पुजा करण्याची परंपरा आहे. या तुम्हाला जर भगवान शंकरासोबत नाग देवतेची कृपा मिळवायची असेल तर या शुभ मुहूर्तावर नागाला दूध अर्पण करा आणि पुजा करा. 

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

४ ऑगस्टला पंचमी तिथी संध्याकाळी ६.४९ वाजता सुरू होईल
५ ऑगस्टच्या दिवशी नागपंचमीचा शुभमुहूर्त ५.४९ ते ८.२८ दरम्यान आहे. याची समाप्ती तिथी दुपारी ३.५४ वाजेपर्यंत असेल. 

नागपंचमीला करा अशी पुजा

या दिवशी महिलांनी भिंतीवर नागाचे चित्र बनवून त्याला दुधाने स्नान घाला आणि पूजा अर्चना करा. याआधी भगवान शंकराची पुजा केली जाते. कालसर्प दोषाने पीडित लोक या विशेष दिवशी पुजा करून शांती करतात. या दिवशी दुधाने रुद्राभिषेक केल्याने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. प्रसाद म्हणून लाह्या आणि दूध वाटले जाते. ज्यांच्या कुंडलीमधअये राहू आहे अशा व्यक्तींनी या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा. 

Nag panchami 2018

नागपुजेचे हे आहे महत्त्व

आपल्याला साऱ्यांनाच माहीत आहे की भगवान विष्णू शेषवर नागावर शयन करतात तर शिव शंकराच्या गळ्याची शोभा नाग वाढवतात. नागाचे महत्त्व पुरातन काळापासून आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग पुजेसोबत शिव शंकराचीही उपासना केली जाते. 

श्रावण महिन्यात असा असावा डाएट प्लान

श्रावण महिन्यात अनेक उपवास असतात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची बरीच चंगळ असते. मात्र या उपवासाच्या पदार्थांमुळे आपल्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत याकडे जरूर लक्ष द्या. 

  1. सकाळी सुरूवातीला कोमट पाणी घ्या.यात तुम्ही लिंबू अथवा मध मिसळू शकता. घोट घोट पाणी पिऊन तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहू शकता. तसेच यामुळे गॅसही होणार नाही. 
  2. सकाळी नऊ वाजेपर्यंत पुजा केल्यानंतर नाश्ता करा. नाश्त्यामध्ये तुम्ही साबुदाणा खीर खाऊ शकता. तसेच फळे खाल्ली तरी चालतात. यासोबतच तुम्ही ड्रायफ्रुटसही खाऊ शकता. यात ५ बदाल आणि २ अक्रोड खा. यामुळे पोट खूप वेळेपर्यंत भरलेले राहील. 
  3. दुपाच्या खाण्यात साबुदाणा खिचडी खा. अथवा उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे खा. यासोबतच सफरचंद अथना नासपती खा. 
  4. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही चहा पिऊ शकता. हवे तर ग्रीन टीही घेऊ शकता. यासोबतच तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यानी बनवलेली ग्रिल्ड अथवा शॅलो फ्राय टिक्की खाऊ शकता. 
  5. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात फलाहार करणार असाल तर उकडलेले रताळे आणि दही खाऊ शकता. 
  6. जर तुम्ही कडधान्य खाणार असाल तर हिरव्या भाज्यांसोबत चपाती आणि डाळ खाऊ शकता. दहीही खाऊ शकता. 
  7. झोपताना दूध जरूर प्या. जर तुम्हाला दूध पचत असेल तरच प्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी