Nag panchami 2022  :  उद्या आहे नागपंचमी, जाणून घ्या या सणाचे महत्त्व आणि पुजेचा मुहुर्त

उद्या २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमी हा सण साजरा होत आहे. हा सण हिंदू धर्मात नाग देवताला समर्पित आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नाग देवतांची पुजा केली जाते. नागपंचमीचा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण मंगळवारी २ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे.

nag panchami 2022
नागपंचमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  उद्या २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमी हा सण साजरा होत आहे.
  • हा सण हिंदू धर्मात नाग देवताला समर्पित आहे.
  • धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नाग देवतांची पुजा केली जाते.

Nagpanchami date 2022: मुंबई : उद्या २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमी हा सण साजरा होत आहे. हा सण हिंदू धर्मात नाग देवताला समर्पित आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नाग देवतांची पुजा केली जाते. नागपंचमीचा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण मंगळवारी २ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. जर कुणाच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर या दिवशी उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया नागापंचमीचे महत्व आणि पुजेचा मुहुर्त. (nagpanchami 2022 know significance and puja muhurt in marathi)

अधिक वाचा : Spider Plant: स्पायडर प्लांट लावा घरात अन् पाहा काय होतात फायदे

नाग देवताची पुजा केल्यास होतात लाभ

धार्मिक मान्यतांनुसार जे लोक मनापासून नाग देवतेची पुजा करतात त्यांच्यावर भगवान शंकराची कृपा होते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सापाची भिती राहत नाही. पुजासोबत या दिवशी काही लोक उपवासही करतात. त्यामुळे भगवान शंकराचा आशिर्वादही मिळतो. साप हा धन दायक असतो असे आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे. म्हणून सापाला मारले नाही पाहिजे, सापाची पुजा केली पाहिजे. जिथे साप आपली शेपटी आपतून जातो तिथे धनलाभ होतो अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पुजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात राहू आणि केतुचा प्रभाव राहत नाही. आयुष्यात खुप संकट असतील तर नाग पंचमीच्या दिवशी भगवान शिवाला रुद्राभिषेक करावा. यामुळे आयुष्यातील संकट दूर होतील. 

अधिक वाचा : Money tips: आर्थिक चणचणीने त्रस्त आहात तर पैशांच्या ठिकाणी ठेवा हे फूल, नाही येणार कमतरता

घरच्या घरी करा पुजा

जर तुम्ही मंदिरात जाऊन पुजा करू शकत नसाल तरी घरच्या घरीही पुजा करू शकता. यासाठी चौरंगावर एक लाल रंगाचा कापड टाका. त्यानंतर शेण किंवा मातीपासून एक नाग किंवा नागदेवताची मूर्ती स्थापन करा. या नागदेवतासमोर एक तुपाचा दिवा लावा. नागदेवतेला दुग्धाभिषेक करा. 

अधिक वाचा : Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील पहिला सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व


नागपंचमीला चुकूनही हे काम करू नका

नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये. जिथे नागाचे बीळ असेल तिथे तर बिल्कूल जमीन खोदू नये. जर साप दिसल्यास त्याला मारू नये. नागपंचमीच्या सांयकाळी सापाचे नाव घेतले नाही पाहिजे. 

अधिक वाचा : Raksha Bandhan : श्री कृष्ण-द्रौपदीपासून इंद्रदेव-शचीपर्यंत, जाणून घ्या रक्षाबंधनाशी संबंधित तीन पौराणिक कथा

नाग पंचमी तिथी आणि वेळ

नाग पंचमी तिथी प्रारंभ : २ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ५ वाजून १३ मिनिट
नाग पंचमी तिथी समाप्ती : ३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी