Navratri 2022: नवरात्रीत असे सजवा तुमचे पुजा घर

धर्म-कर्म-भविष्य
Updated Sep 23, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navratri 2022 Temple decoration ideas:नवरात्रीला पुजा करण्याआधी तुम्ही आपल्या घरी दुर्गा मातेचे मंदिर या पद्धतीने सजवू शकता. 

navratri
Navratri 2022: नवरात्रीत असे सजवा तुमचे पुजा घर 
थोडं पण कामाचं
  • तुम्ही मंदिराच्या सजावटीसाठी अनेक पद्धतीने मातीने बनवलेल्या वस्तूंचा वापर करू शकता.
  • तुम्ही फेअरी लाईट्सचा वापर करून मंदिर सजवू शकता.
  • तुम्ही मंदिर सजवण्यासाठी हँडीक्राफ्ट आयटम्सचाही वापर करू शकता.

मुंबई: यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्रीला(shardiya navratri) २६ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. नऊ दिवस दुर्गा मातेला(durga mata) प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरात तिची विधीवत पुजा करतात. तसेच घरातील मंदिरही(temple) यासाठी सजवले जाते. यावेळेसही तुम्ही अनेक पद्धतीने मातेचे मंदिर सजवू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या आणि चांगल्या आयडिया(idea) देत आहोत ज्या वापरून तुम्ही तुमे मंदिर सजवू शकता. navratri 2022 temple decoration ideas at home 

अधिक वाचा - मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स

मातीने करा सजावट

तुम्ही मंदिराच्या सजावटीसाठी अनेक पद्धतीने मातीने बनवलेल्या वस्तूंचा वापर करू शकता. तुम्ही मातीने बनवलेले दिवे, लटकन, मातीची भांडी आदी वस्तू वापरून सुंदर सजावट करू शकता. तुम्ही मातीच्या एका मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात दिवे पेटत ठेवू शकता. तसेच अनेक पद्धतीने मातीने बनलेले दिवे मार्केटमध्ये तसेच ऑनलाईन मिळतात. तुम्ही अनेक लहान लहान मातीची भांडी मंदिरात सजवू शकता. यामुळे मंदिर दिसण्यास सुंदर दिसेल. 

फेअरी लाईट्सचा करा वापर

तुम्ही फेअरी लाईट्सचा वापर करून मंदिर सजवू शकता. अनेक प्रकारच्या रंगांच्या लाईट्स तुम्ही मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवर सजवू शकता. अनेक प्रकारचे लाईट्स लावल्याने तुमचे मंदिर खूप सुंदर दिसेल. तसेच फेअरी लाईट तुम्ही काचेच्या छोट्या बॉटलमध्ये ठेवू शकता. तसेच ही बॉटल तुम्ही मंदिरातील रूममध्ये ठेवू शकता. जेव्हा ही लाईट ऑन कराल हे दिसण्यास अतिशय सुंदर दिसेल. सोबतच तुमच्या मंदिराच्या रूमला एक वेगळा लूक येईल. 

हँडीक्राफ्टचा करा वापर

तुम्ही मंदिर सजवण्यासाठी हँडीक्राफ्ट आयटम्सचाही वापर करू शकता. तुम्हाला मार्केटमध्ये अथवा ऑनलाईन अनेक टेराकोटाने बनलेले छोटे छोटे आयटम्स मिळतील. तुम्ही ते मंदिरात सजवू शकता. यामुळ तुमच्या मंदिराच्या सजावटीला एथनिक लूक मिळेल. अ

अधिक वाचा - Ind vs Aus: दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE?

फुले आणि रांगोळीने करा सजावट

प्रत्येक सणाला रांगोळी काढली जाते. नवरात्रीत तुम्ही दुर्गा मातेच्या स्वागतासाठी रांगोळी बनवू शकता. मंदिरातील खोलीत तुम्ही रंग आणि दिव्यांचा वापर करून रांगोळी बनवू शकता. रांगोळी काढणे हे शुभ मानले जाते. तुम्ही फुलांच्या मदतीनेही मंदिराची सजावट करू शकता. फुलांचा वापर तुम्ही अनेक पद्धतीने करू शकता. 

अनेक प्रकारच्या फुलांच्या माळा बनवून तुम्ही मंदिर सुशोभित करू शकता. याशिवाय तुम्ही फुलांची रांगोळीही काढू शकता. सुंदर फुलांमुळे तुमच्या मंदिराची शोभा अधिक वाढेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी