Navratri 9 Colors: 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग, पाहा आजचा रंग कोणता

Navratri Colours 2020 Full Schedule: नवरात्रीला नऊ विविध रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहा यंदा नवरात्रीमधील नऊ रंग कोणते आहेत ते. पाहा आजचा रंग कोणता आहे ते.

ma_durga
'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • पाहा नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत ते
 • नवरात्रीनिमित्त नऊ रंगाची उधळण
 • नवरात्रीचा पहिला रंग करडा

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे गेले अनेक महिने सण-उत्सव हे अगदी साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. यंदा दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे उत्सव हे कोरोनामुळे अगदी जल्लोषात साजरा करता आले नाही. दरम्यान, नवरात्रोत्सवापर्यंत कोरोनावरील लस येईल आणि त्यानंतर सारं काही सुरुळीत होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप तरी कोणतीही लस आलेली नसल्याने सोशल डिस्टन्सिंग हाच या रोगापासून दूर राहण्याचा उपाय आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवावर देखील बंधनं आली आहेत. कोरोनाचं संकट समोर आ वासून उभं असल्याने यंदा दांडिया आणि गरबा यावर देखील बंदी घालण्यात आली. मात्र असं असलं आपण आपले सणांची परंपरा कायम राखणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य ते भान राखून आपण यंदाचा नवरात्रोत्सव देखील साजरा करुयात.

नवरात्रोत्सव म्हटलं की, नऊ रंग ही सध्या या सणाची ओळख झाली आहे. म्हणजेच नवरात्रीमध्ये नऊ विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करुन आपल्या ग्रुपचा फोटो काढले जातात. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रात नवरांगांची ही नवी प्रथाच सुरु झाली आहे. यंदा कोरोनाच्या काळात अशा उपक्रमाची आपणा सगळ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे यंदा देखील नवरंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घ्या ९ दिवसाचे ९ रंग कोणते ते.  

 माळ वार तारीख  रंग
पहिली माळ शनिवार १७ ऑक्टोबर करडा (ग्रे)
दुसरी माळ रविवार १८ ऑक्टोबर केशरी
तिसरी माळ सोमवार १९ ऑक्टोबर पांढरा, सफेद  
चौथी माळ मंगळवार २० ऑक्टोबर लाल 
पाचवी माळ बुधवार २१ ऑक्टोबर निळा
सहावी माळ गुरुवार २२ ऑक्टोबर पिवळा
सातवी माळ शुक्रवार २३ ऑक्टोबर हिरवा 
आठवी माळ शनिवार २४ ऑक्टोबर जांभळा
नववी माळ रविवार २५ ऑक्टोबर गुलाबी (रोझ)

तिसरी माळ - आजचा रंग : पांढरा

 1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते. यालाच घटस्थापना म्हणतात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री अवताराची पुजा केली जाते. राखाडी हा रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. 
 2. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रम्हचारिणी या रूपाची पुजा केली जाते. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
 3. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग शांतता, निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे. 
 4. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते. लाल हा रंग आवड,शुभ आणि रागाचे प्रतीक आहे. 
 5. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्त स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा केली. निळा रगं हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. 
 6. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. 
 7. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. 
 8. नवरात्रीच्या आठव्या दिवशी गौरी देवीची आराधना केली जाते. हा रंग इच्छाशक्ती तसेच ध्येयपूर्तीचे प्रतीक मानला जातो. 
 9. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीधात्री देवीची पूजा अर्चा केली जाते. जांभळा रंग हा महात्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी