Astrology Tips: कितीही निकड असली तरी या पाच गोष्टी घेऊ नका उधार, जाणून घ्या कारणे

अनेक वेळेला आपल्या एखाद्या वस्तूची निकड असते आणि ती नेमकी आपल्याकडे नसते. अशा वेळी आपण कुणाकडे तरी ही वस्तू उधार घेतो आणि परत करतो. आयुष्यात अशा वस्तूंची देवघेव घेणे गरजेचे आहे, कारण लहानपणापासून शेअरिंग इस केअरिंग शिकवले जाते. परंतु याचे अंधानुकरण करणे चुकीचे आहे.

watch
घड्याळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक वेळेला आपल्या एखाद्या वस्तूची निकड असते आणि ती नेमकी आपल्याकडे नसते.
  • अशा वेळी आपण कुणाकडे तरी ही वस्तू उधार घेतो आणि परत करतो.
  • ज्योतिषशास्त्रानुसार अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या कुणाकडून उधार घेता कामा नये.

Never Borrow These Things From Others: अनेक वेळेला आपल्या एखाद्या वस्तूची निकड असते आणि ती नेमकी आपल्याकडे नसते. अशा वेळी आपण कुणाकडे तरी ही वस्तू उधार घेतो आणि परत करतो. आयुष्यात अशा वस्तूंची देवघेव घेणे गरजेचे आहे, कारण लहानपणापासून शेअरिंग इस केअरिंग शिकवले जाते. परंतु याचे अंधानुकरण करणे चुकीचे आहे. अशावेळी तुमच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या राहू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या कुणाकडून उधार घेता कामा नये. ज्योतिषशास्त्रानुसार अशा गोष्टी घेतल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

पेन किंवा लेखणी

पेन ही महत्त्वाची वस्तू आहे. आपल्या खिशात किंवा बॅगेत नसेल आणि गरज असल्यास एखाद्या माणसाकडे आपण बिनदिक्कत पेन मागतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुणाकडूनही पेन घेणे चुकीचे आहे. यामुळे आयुष्यात प्रगती खुंटते. वेदांनुसार चित्रगुप्त आपल्या लेखणीने आपल्या आयुष्यातील येणार्‍या अडचणी सुख लिहितात. यासाठी शास्त्रात पेन किंवा लेखणीला महत्त्व आहे. 


अंगठी

अंगठी हा असा दागिना आहे जो स्त्री आणि पुरुष दोघेही घालतात. काही हौशी लोक अंगठीत एखादा रत्नही घालतात आणि अंगठी घालतात. परंतु अंगठी ही अशी वस्तू आहे जी आपण उधार घेता कामा नये. असे केल्यास आर्थिक संकट येऊ शकतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.  


कंगवा 

अनेक पुरुष आपल्या खिशात छोटी फणी किंवा कंगवा ठेवतात. परंतु आपण वापरलेला कंगवा कुणाला देऊ नका किंवा कुणाचा वापरलेला कंगवा वापरू नहे. असे केल्यास तुम्हच्या भविष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच आरोग्य तज्ज्ञांनुसार दुसर्‍याचा वापरलेला कंगवा वापरल्यास इन्फेक्शनचा धोका असतो.

कपडे

फक्त शास्त्रातच नव्हे तर वैद्यकशास्त्रातही दुसर्‍यांचे कपडे वापरू नये असे सांगितले जाते. दुसर्‍याचे वापरलेले कपडे वापरल्यास भाग्य साथ देत नाही असे सांगितले जाते. तसेच आयुष्यात अनेक समस्या येतात असेही म्हटले जाते. 

घड्याळ

काहींना सवय असते मित्राचे किंवा ओळखीच्या व्यक्तीचे महाग आणि उंची घड्याळ उधार घेऊन वापरण्याची. ज्योतिषशास्त्रानुसार घडाळ्याचा संबंध माणसाच्या चांगल्या आणि वाईट वेळेशी असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे घड्याळ घेतल्याच त्याची वाईट वेळही आपल्याकडे येते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. म्हणून दुसर्‍याचे घड्याळ वापरणे चुकीचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी