Vastu Tips: पोळपाट-लाटणे खरेदी करण्याआधी जाणून घ्या नियम, या दिवशी करू नका खरेदी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 20, 2022 | 17:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू खरेदी करण्याचा एक दिवस असतो. जर त्या दिवशी त्या हिशेबाने वस्तू खरेदी केली गेली तर ते शुभ असते. आज जाणून घेऊया पोळपाट-लाटणे खरेदी करण्याचे नियम

chakla belan
पोळपाट-लाटणे या दिवशी करू नका खरेदी नाहीतर होईल नुकसान... 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला पोळपाट-लाटणे खरेदी करायचे आहे.तर दिवसांबद्दल ध्यान जरूर ठेवा
  • पोळपाट-लाटणे खरेदी करण्याचा सगळ्यात शुभ दिवस बुधवारी आहे.
  • किचनमध्ये पोळपाट-लाटणे खरेदी करताना लक्षात ठेवा की कधीही हा उलटा करून ठेवू नका

मुंबई: किचनमध्ये(kitchen) असेले पोळपाट-लाटणे घरात सुख-समृद्धी आणण्यास मदत करते. किचनमध्ये अनेक वस्तूंचा वापर वास्तुनुसार केला जातो. प्रत्येक गोष्टीच्या वापराबाबत काही नियम सांगितले आहेत. जर या गोष्टींचा वापर नियमांनुसार केला गेला नाही तर ते नुकसानदायक ठरू शकते.या प्रकारे किचनमध्ये चपाती बनवण्यासाठी वापरले जाणारे पोळपाट-लाटणे खूप महत्त्वाचे असते. याच्या वापरापासून ते खरदी करेपर्यंतंच्या नियमाबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊया...never buy chakla belan on this days

अधिक वाचा - एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या

पोळपाट-लाटणे खरेदी करताना लक्षात घ्या गोष्टी...

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला पोळपाट-लाटणे खरेदी करायचे आहे. तर दिवसांबद्दल ध्यान जरूर ठेवा. वास्तुजाणकारांच्या मते कोणत्याही मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी चुकूनही पोळपाट-लाटणे खरेदी करू नका याशिवाय इतर कोणत्याही दिवशी तुम्ही याची खरेदी करू शकता. 

पोळपाट-लाटणे खरेदी करण्याचा सगळ्यात शुभ दिवस बुधवारी आहे. जर या दिवशी पोळपाट-लाटणे खरेदी केले तर त्या व्यक्तीला सुख-समृद्धी प्राप्त होते. 

किचनमध्ये पोळपाट-लाटणे खरेदी करताना लक्षात ठेवा की कधीही हा उलटा करून ठेवू नका. असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. पोळपाट उभे ठेवून आणि लाटणे लटकूनच ठेवा. 

यासोबतच हे ही लक्षात ठेवा की पोळपाट-लाटणे तांदूळ अथवा पीठाच्या डब्यावर ठेवू नका. असे करणे अशुभ मानले जाते. 

वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्याआधी पोळपाट-लाटणे साफ करून घ्या. असे मानले जाते की पोळपाट-लाटणे वापरण्याने व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

अधिक वाचा -  WARDHA | केंद्राने'अग्निपथ' योजना रद्द करावी - कारळे सर

पोळपाट-लाटणे खरेदी करताना जरूर लक्षात ठेवा की त्याचा आवाज येता कामा नये. आवाज येणारे पोळपाट-लाटणे वापरले की घरात अशांती निर्माण होते. 

तुटलेले पोळपाट-लाटणे चुकूनही वापरू नका. कारण यामुळे घरात द्रारिद्रय येते. सोबतच धनहानी होण्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी