मुंबई: अनेकदा लाखो प्रयत्न करूनही घरात पैसा(money) टिकत नाही. येणारा पैसा आणि खर्च यांच्यात संतुलन न राहिल्यास माणूस कंगालीवर पोहोचतो. ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) आर्थिक बाबतीत माणसाचे दारिद्रय हे घराच्या कोपऱ्यांमध्ये लपलेले असते. घराच्या तीन प्रमुख कोपjs माणसाच्या दारिद्रयाबाबत जोडले जाऊ शकते. never do this mistake about money
अधिक वाचा - मेट्रोमध्ये चिमुकल्या मुलीचा मस्त डान्स व्हायरल
पाण्याची टाकी - घराच्या छतावर पाण्याची टाकी जर दक्षिण-पूर्व दिशेला असेल तर ते खूप नुकसानदायक ठरते. खरंतर हे अग्निचे स्थान असते आणि अग्नीच्या स्थानावर जेव्हा जल ठेवले जाते तेव्हा जीवनात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो. सोबतच घरात वाद, कोर्ट-कचेरी, मारहाण, वाद-विवादासारख्या समस्या वाढतात.
टॉयलेट - वास्तुनुसार जर घरात टॉयलेट उत्तर-पूर्व दिशेला बनले असेल तर व्यक्तीला पैशांच्या समस्येचा सामना करावा लागतो. ही चूक तुम्हाला आर्थिक बाबतीत कमकुवत बनवते. तर आरोग्याशी संबंधित समस्या होतात. यासाठी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला कधीही टॉयलेट असता कामा नये.
घराची उत्तर दिशा - जर घराच्या उत्तर दिशेला घाण राहत असेल अथवा सामान विखुरलेले असेल तर हे गरिबीचे कारण ठरू शकते. या दिशेला कचरा तसेच घाण असता कामा नये. उत्तर दिशा हे भगवान कुबेराचे स्थान असते. यासाठी या दिशेने येणाऱी उर्जा तुमच्या जीवनाशी दशा ठरवते.
अधिक वाचा - झेब्राच्या कळपातला वाघ शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम
वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींना भेगा पडणे अशुभ असते. यावरून कुटुंबात वाद असल्याचे संकेत मिळतात. तर उत्तर दिशेच्या भिंतींमध्ये भेगा असल्यास ते अधिक अशुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळे घराच्या आर्थिक समृध्दीसाठी उत्तर दिशेच्या भिंतींला भेगा पडून देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाण्याचा नळ बसवणे अशुभ असते. या दिशेला पाण्याचा नळ बसवल्याने घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच घरातील लोकांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.