Married Life Tips: पायात जोडवी घालताना करू नका ही चूक, नवऱ्याच्या आयु्ष्यावर होईल परिणाम

धर्म-कर्म-भविष्य
Updated Apr 25, 2022 | 17:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips: जोडवी घालताना जर महिलांनी काही गरजेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर ते तिच्या पतीसाठी घातक ठरू शकते. 

toering
Married Life: पायात जोडवी घालताना करू नका ही चूक, नाहीतर... 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्म-शास्त्रात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जोडवी कधीही सोन्याची घालू नयेत.
  • चांदीचीच जोडवी घातली जाते.
  • जोडवी केवळ दागिना नाही तर ते सौभाग्याचे लक्षण आहे.

मुंबई: हिंदू धर्मात(Hindu religion) लग्न झालेल्या महिलांनी काही दागिने(ornaments) घालणं अतिशय गरजेचे सांगितले आहे. यात डोक्यावर टिकली, गळ्यात मंगळसूत्र याशिवाय पायात जोडवी घालणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जोडवी घालणे इतकं महत्त्वाचं आहे की विवाहाच्या वेळेस याचा एक विधीही असतो. जोडवी हा महिलेच्या सौभाग्याचे लक्षण असते. मात्र यात जर घालताना चूक झाली तर नवऱ्याच्या आयुष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. दरम्यान याबाबत योग्य ती काळजी घ्या.

अधिक वाचा - दुधी भोपळा आहे मोठा गुणकारी...पाहा 5 जबरदस्त फायदे

जोडवी घालताना करू नका या चुका

हिंदू धर्म-शास्त्रात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जोडवी कधीही सोन्याची घालू नयेत. चांदीचीच जोडवी घातली जाते. पायात कधीही सोन्याचे दागिने परिधान करू नयेत. मग ते जोडवी असो, पैंजण असो वा इतर दागिने. 

जोडवी केवळ दागिना नाही तर ते सौभाग्याचे लक्षण आहे. ते कधीही दुसऱ्या महिलांना देऊ नका. तसेच कोणाकडेही बदलू नका. असे केल्याने पतीवरचा तणाव वाढतो. यामुळे धनहानी होते तसेच त्याच्यावर कर्जाचे ओझे वाढते. 

कधीही आवाज करणारे पैंजण अथवा जोडवी घालू नये. भले घुंगरांचा आवाज ऐकण्यास छान वाटत असेल मात्र वास्तुनुसार असे दागिने आयुष्यात समस्या आणू शकतात. त्यामुळे आवाज न करणारे अथवा कमी आवाजाचे दागिने घाला.

अधिक वाचा - केजीएफ 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका

जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्या बोटात घाला. अनेक महिला पायाच्या एकापेक्षा अधिक बोटांमध्ये आणि अंगठ्यातही जोडवी घालतात. असे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इतर बोटांमध्ये जोडवी घाला अथवा नका घालू मात्र अंगठ्यानंतरच्या बोटात जरूर जोडवी घाला. 

या 2 राशीच्या लोकांनी पायात काळा धागा घालू नये

मेष - मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे  आणि मंगळ काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी काळा धागा घालणे टाळावे असे सांगितले जाते. असे मानले जाते की मेष राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा घातल्यास काहीतरी वाईट घडू शकते.

वृश्चिक - वृश्चिक राशीचा अधिपती हा मंगल देव आहे आणि मेष राशीप्रमाणे मंगळ देवाला काळा रंग आवडत नाही. यामुळे या राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधणं योग्य नाही किंवा शुभ नाही. या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी