chandra grahan 2020: ५ जुलैला आहे वर्षातील तिसरे चंद्र ग्रहण, चुकूनही ही कामे करू नका

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 27, 2020 | 18:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

chandra grahan 2020: ज्योतिष शास्त्रात असे मानण्यात आले आहे की चंद्र ग्रहणामध्ये काही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. तर काही कामे केल्यास चांगली फळे मिळतात. 

lunar eclipse
वर्षातील तिसरे चंद्र ग्रहण, चुकूनही ही कामे करू नका 

थोडं पण कामाचं

  • या वर्षात २०२०मध्ये एकूण ६ ग्रहणे असतील. यातील दोन चंद्र ग्रहण (१० जानेवारी, ५ जून) आणि एक सूर्यग्रहण(२१ जून) लागले होते
  • ५ जुलैला लागणाऱ्या या चंद्र ग्रहणात सूतककाळ मान्य नसेल.
  • चंद्र ग्रहणादरम्यान अन्न ग्रहण करू नये.

मुंबई: यंदाच्या वर्षातील तिसरे चंद्र ग्रहण(Lunar eclipse) येत्या ५ जुलैला असणार आहे. या ग्रहण काळात सुतक काळ मान्य नसेल. हे भारता(india)सहित दक्षिण आशियातील काही भाग,अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल. या वर्षात २०२०मध्ये एकूण ६ ग्रहणे असतील. यातील दोन चंद्र ग्रहण (१० जानेवारी, ५ जून) आणि एक सूर्यग्रहण(२१ जून) लागले होते. आगामी दोन चंद्र ग्रहणे आणि एक सूर्य ग्रहण बाकी आहे. ५ जुलैला लागणाऱ्या या चंद्र ग्रहणात सूतककाळ मान्य नसेल. याचा अर्थ कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये वर्जित केली जाणार नाहीत. पुजा(worship) आणि जेवण(food) यासंबधित कार्ये करू शकतो. मात्र काही गोष्टींसाठी संयम ठेवणे  गरजेचे आहे आणि काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ५ जुलैला लागणाऱे चंद्र ग्रहण हे उपछाया चंद्र ग्रहण आहे. 

चंद्र ग्रहणाची वेळ

ग्रहण स्पर्श - सकाळी ८.३८ मिनिटांनी
ग्रहण काळ - सकाळी ९.५९ मिनिटांनी
अंतिम स्पर्श - सकाळी ११.२१ मिनिटांनी
ग्रहणाचा एकूण कालावधी - २ तास ४३ मिनिटे २४ सेकंद

चंद्र ग्रहणादरम्यान ही कामे करू नका

  1. चंद्र ग्रहणादरम्यान केसांना तेल लावणे, भोजन करणे, पाणी पिणे, झोपणे, केस विंचरणे, संबंध ठेवणे, दात घासणे, कपडे धुणे, टाळे खोलणे अशी कामे करणे टाळावीत. 
  2. चंद्र ग्रहणाच्या वेळेस देवाच्या मूर्तीलाही स्पर्श करू नये
  3. चंद्र ग्रहणादरम्यान अन्न ग्रहण करू नये. असं मानलं जात की तुम्ही जितके अन्नाचे दाणे तुम्ही खाता तितक्या यातना नरकात झेलाव्या लागतात. 
  4. चंद्र ग्रहणादरम्यान झोपू नये. चंद्र ग्रहणात तीन प्रहार अर्थात तीन तास जेवू नये. दरम्यान, हा नियम आजारी, मुले आणि वृद्धांना नाही. 
  5. स्कंद पुराणानुसार चंद्र ग्रहणादरम्यान दुसऱ्याने दिलेले अन्न खाल्ल्याने पुण्याचा नाश होतो. 
  6. चंद्र ग्रहणादरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये. मनातल्या मनात देवाचे नामस्मरण केले पाहिजे. 

चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी कराव्यात

चंद्र ग्रहण सुरू होण्याआधी देवाची पुजा अर्चा करून हवन केला पाहिजे. 

पुराणानुसार ग्रहणाच्या वेळेस दान केल्याने अनेक फळे मिळतात. या दरम्यान, पुण्य कर्मे केली पाहिजेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी