Astro Tips for loan: या राशीच्या लोकांनी कोणालाही देऊ नये उधार अन्यथा व्हाल कंगाल

Astrology for financial crisis: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या संबंधित काहीना काही सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 6 राशींच्या संदर्भात सांगण्यात आले आहे की, त्यांनी इतर राशीच्या व्यक्तींना कर्ज देऊ नका.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Financial Tips: तुम्हाला अनेकांनी सांगितले असेल की, कोणाकडून उधार घेऊ नका आणि उधार देऊ सुद्धा नका. मात्र, अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, त्यामुळे अनेकांना कधी पैसे उधार घ्यावे लागतात किंवा उधार द्यावे लागतात. मात्र, कधी-कधी उधार देणं तुमच्याच अंगाशी येऊ शकतं. ज्योतिषशास्त्रात काही अशाच राशींच्या संदर्भात सांगण्यात आले आहे, ज्यांनी उधार देताना विचार करायला हवा. शक्य असेल तर कोणालाही उधार देऊ नका. जर खूपच आवश्यक असेल तर कागदोपत्री कारवाई करुन उधार देणं योग्य ठरेल. जाणून घेऊयात उधार देताना कोणत्या राशीच्या व्यक्तींनी सतर्क रहायला हवे. (never give loans to these zodiac sign people otherwise you will face problems read in marathi)

मिथुन / Gemini

मिथुर राशीचे व्यक्ती स्वभावाने थोडे भावूक असतात. ज्यामुळे त्यांना संकोच अधिक असतो आणि परिणामी त्यांनी उधार दिलेले पैसे परत मागणं शक्य होत नाही. आपण इतरांना उधार दिलेले पैसे परत मागताना ते खूप विचार करतात आणि त्यामुळे ते उधार दिलेले पैसे परत मागत नाहीत. आपलेच पैसे परत न मागण्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती प्रभावित होते.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

कर्क / Cancer

या राशीचे व्यक्ती स्वभावाने खूपच भावूक असतात आणि दिलदार असतात. या राशीचे व्यक्ती कधीही कोणालाही उधार देताना नकार देऊ शकत नाहीत. आपण उधार दिलेले पैसे परत न मिळाल्यास ते स्वत: विचार करत बसतात. या राशीच्या व्यक्तींनी ज्यांना उधार पैसे दिलेले असतात ते पैसे परत मिळाले नाही तर ते पैसे मागण्यातही त्यांना संकोच वाटतो. या राशीच्या व्यक्तींना वाटते की, आपण दिलेले पैसे परत मागितले तर समोरच्याला त्रास होऊ शकतो. जेव्हा दोन-तीन वेळा पैसे मागितल्यावरही मिळत नाहीत तेव्हा ही लोक नाराज होतात आणि पैसे नंतर मागतही नाहीत.

तूळ / Libra

या राशीचे व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप समतोल राखून चालतात. मात्र, या राशीचे व्यक्ती नात्याच्या बाबतीत खूपच भावूक असतात. अशा परिस्थितीत त्यांनी इतरांना उधार दिलेले पैसे अडकण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींनी नातेसंबंधात किंवा मैत्रीत उधार, पैशांची देवाण-घेवाण करू नये.

हे पण वाचा : तुम्हीही ऑनलाईन औषधी मागवता? मग हे वाचाच...

धनु / Sagittarius

या राशीचे व्यक्तींना आपण उधार दिलेले पैसे डुबण्याची भीती वाटते. इतकेच नाही तर यांचे पैसे अनेकजण दोन-चार वेळा मागितल्यावरही परत करत नाहीत. यामुळे वाद-विवाद होऊ शकतात. यामुळे संबंधित लोकं प्रभावित होऊ शकतात. या राशीच्या व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. जर तुम्ही या दिवशी कोणाला उधार पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. 

कुंभ / Aquarius

या राशीचे व्यक्ती थोडे गंभीर स्वभावाचे असतात. त्यामुळे ही लोक उधार देणं किंवा घेणं टाळतात. मात्र, कोणालाही उधार देतात तर त्यांच्याकडे पुन्हा पैसे मागण्यात संकोच करतात. ज्यांनी उधार पैसे घेतले आहेत त्यांनी स्वत:हून पैसे परत दिले तर चांगली गोष्ट आहे अन्यथा या राशीचे व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडे पैसे मागत नाहीत. या राशीचे व्यक्ती जर कोणाला पैसे उधार देत असतील तर त्यापूर्वी कागदोपत्री व्यवहार करणं योग्य मानतात.

हे पण वाचा : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मीन / Pisces

या राशीच्या व्यक्तींनी उधार देण्यापासून लांबच रहावे. या राशीच्या व्यक्तींनी कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते पुन्हा मागणं त्यांना जमत नाही. अशा परिस्थितीत ते स्वत: विचार करत बसतात आणि मानसिक त्रास करुन घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी