Tulsi Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू अन्यथा व्हाल कंगाल

Vastu Tips in Marathi: वास्तूशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाची पूजा सुद्धा मनोभावे करण्यात येते. तुळशीची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. मात्र, तुळशीच्या रोपाच्या संबंधित काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Vastu Tips for Tulsi plant at your home: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, घराच्या आवारात तुळशीची पूजा नियमितपणे केल्याने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. वास्तूशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. मात्र, तुळशीच्या रोपाच्या संदर्भात लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुळशीच्या रोपाच्या आसपास अजिबात ठेवू नयेत.

गणपती बाप्पाची मूर्ती

एका पौराणिक कथेनुसार, एकदा नदीच्या किनाऱ्यावर गणपती बाप्पा ध्यान करत होते. तेव्हा तेथून तुळशी प्रकट झाली आणि सौंदर्य पाहून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, गणेशजींनी त्यांना नकार दिला. यामुळे तुळशीने नाराज होऊन गणेशजींना दोन लग्नाचा शाप दिला. याच कारणामुळे, तुळशीजवळ गणरायाची मूर्ती ठेवली जात नाही आणि त्यांना तुळस अर्पण सुद्धा केली जात नाही.

हे पण वाचा : त्वचेसाठी अक्रोडचे तेल फायद्याचे, लावा अन् चमत्कार पहा

झाडू

तुळशीच्या रोपाच्या जवळ कधीही झाडू ठेवू नये. कारण, झाडूचा वापर घरातील साफसफाई करण्यासाठी केला जातो. त्यामुळे झाडू तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नये. झाडू तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास घरात दारिद्र्य येते.

हे पण वाचा : उन्हाळ्यात कुठे-कुठे जायाचं हनीमूनला?

चप्पल-शूज

तुळशीच्या रोपाजवळ कधीही चप्पल ठेवू नये. कारण, असे केल्याने लक्ष्मी मातेचा अपमान होतो. लक्ष्मी माता नाराज झाल्याने त्या व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच चप्पल आणि शूज हे राहु आणि शनीचं प्रतिक मानलं जातं.

हे पण वाचा : या टिप्स वापरा बोअरिंग रिलेशनशिपमध्ये येईल ताजेपणा

शिवलिंग

वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग अजिबात ठेवू नये. कारण, तुळस भगवान विष्णूला प्रिय आहे. तुळशीच्या पूर्व जन्मात नाव वृंदा होते जी जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. मात्र, जालंधरच्या अत्याचाराला कंटाळून शिवजींनी त्याचा वध केला होता. त्यामुळेच शिवजींची पूजा करत असताना तुळशीचा वापर केला जात नाही. 

हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात

कचराकुंडी

तुळशीच्या जवळपास कधीही कचराकुंडी ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपट्याजवळ किंवा आसपास घाण, कचरा, कचराकुंडी ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी