Vastu Tips in morning: आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक नेहमीच काही ना काही सल्ले देत असतात. मात्र, अनेकदा तरुण पिढी याकडे दुर्लक्ष करु लागतात. वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी येते. वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय केल्यास तुमचे भाग्य उजळून येऊ शकते. तसेच त्याकडे दुर्लक्ष केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (never see these things in the morning it affects you in wealth prosperity read in marathi)
सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहण्याला वास्तूशास्त्रात अशुभ मानले आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रावर विश्वास ठेवणारे या गोष्टींकडे पाहणं टाळतात. जाणून घ्या सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी पाहणे टाळायला हवे.
आपल्यापैकी अनेकजण हे घरामध्ये हिंसक प्राण्यांचे फोटो किंवा एखादी प्रतिमा ठेवतात. हे फोटो सकाळी उठल्यावर त्यांच्या समोर असल्याने दिसून येतात. मात्र, हे चित्र सकाळी उठल्या-उठल्या पाहणे टाळायला हवे.
हे पण वाचा : जेवणात चुकून पडले जास्त मीठ तर असे करा झटक्यात कमी
सकाळी उठल्यावर आपली किंवा इतरांची सावली पाहू नये. पश्चिम दिशेला सावली दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते.
वास्तूनुसार, सकाळी उठल्यावर न धुतलेली भांडी पाहू नयेत. त्यामुळेच रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी स्वच्छ धुवून ठेवावी असे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा : हिवाळ्यात प्या गुळाचा चहा अन् जादू पहा
सकाळी उठल्या-उठल्या कधीही आरसा पाहू नये. असं म्हटलं जाते की, सकाळी उठल्यावर आरशात पाहिल्यास रात्रभरातील नकारात्मकता प्राप्त होते.
वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर आपले हात पहावे. असे मानले जाते की, सरस्वती आणि लक्ष्मी माता आपल्या हाताच्या तळव्यात वास्तव्य करतात. हात पाहून देवाचे नामस्मरण करा त्यानंतर आपले हात चेहऱ्याला लावा. यानंतर सूर्यदेवाचे दर्शन घ्या.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)