Astro tips: य़ावेळेस तुम्ही झोपलात तर लक्ष्मी माता होऊ शकते नाराज, वाढते नकारात्मकता

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 25, 2022 | 18:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips for sleeping: हिंदू धर्मात बऱ्याच अशा कामांबद्दल सांगितले आहे जी वेळेत न करणे अशुभ मानले जाते. असेच ज्योतिषशास्त्रात झोपण्याबाबतही काही नियम सांगितले आहेत. 

sleeping
Astro: य़ावेळेस तुम्ही झोपलात तर लक्ष्मी माता होऊ शकते नाराज 
थोडं पण कामाचं
  • देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हमुहूर्त उत्तम
  • सूर्योदयाच्या वेळेस झोपणे अशुभ मानले जाते
  • यामुळे लक्ष्मी माता नाराज होऊन जाते. 

मुंबई: माणसाने केलेल्या शुभ(shubh) तसेच अशुभ कामांचा परिणाम आपल्या जीवनावर(life) होत असतो. यामुळे प्रत्येक काम एका निश्चित वेळेत करणे गरजेचे असते. काही कार्ये निश्चित वेळेनुसार करण्यासाठी यासाठी सांगितले जाते कारण ग्रह आणि नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासून बचाव होईल. मात्र अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात. यातील एक म्हणजे कोणत्याही वेळेस झोपणे(sleeping).Never sleep on this times, otherwise laxmi mata will get angry

अधिक वाचा - या स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेल्यावर जातो जीव

असे म्हणतात की आरोग्य चांगले राखण्यासाठी तसेच थकवा दूर करण्यासाठी व्यक्ती पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. मात्र जर झोप चुकीच्या वेळेस झाली तर याचा प्रभाव व्यक्तीच्या प्रगतीवर पाहायला मिळतो. जाणून घेऊया की ज्योतिषानुसार कोणत्या वेळेस झोपणे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा निर्माण करते. 

चुकूनही यावेळेस झोपू नका

धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही व्यक्तीने सूर्यास्ताच्या वेळेस झोपू नये. असे मानले जाते की जी व्यक्ती यावेळेस झोपते त्यामुळे देवी-देवता नाराज होतात. तसेच हे त्यांच्या दुर्भाग्याचे कारण ठरते. ज्योतिषाचार्यानुसार सूर्यास्ताच्या वेळेस देव-देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात. यावेळेस झोपणे हे नकारात्मकतेचे कारण ठरते. तसेच प्रगतीत अडथळा निर्माण होतो. 

नाराज होते लक्ष्मी माता

शास्त्रात व्यक्तीला ब्रम्हमुहूर्तावर उठणे चांगले मानले जाते. जे लोक सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांच्यावर लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. अशा घरात सुख-समृद्धी कमी होते. तसेच जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. 

अधिक वाचा - सुबोध भावेची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

असे मानले जाते की ब्रम्हमुहूर्त म्हणजेच सूर्योदयाच्या आधी देव-देवतांचे मिलन असते. यावेळेस झोपेतून उठण्याचा योग्य काळ मानला जातो. अशातच जे लोक सूर्योदयाच्या वेळेस उठत नाहीत त्यांच्यावर देव-देवता नाराज होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी