Astrology: फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 15, 2022 | 12:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकदा आपण स्वत:चे सामान काही काळापर्यंत अथवा खराब झाल्यानंतर बदलतो अथवा फेकून देतो. यात आपल्या पर्सचाही समावेश असतो. अनेकदा पर्स फाटली अथवा जुनी झाल्यास ती बदलली जाते अथवा फेकून दिली जाते. मात्र ज्योतिषशास्त्रात यावर उपाय सांगितला आहे. 

wallet
फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल 
थोडं पण कामाचं
  • जर तुम्ही जुनी पर्स नव्या पर्ससह बदलत आहात तेव्हा जुन्या पाकिटातील सामान काढून नव्या पाकिटात ठेवा.
  • जर तुमच्यासाठी तुमचे जुने पाकीट लकी ठरत असेल तर ती फेकण्याची चूक कधीही करू नका.
  • जर तुमचे तुमच्या जुन्या पाकिटावर प्रेम आहे आणि तुम्हाला ते फेकून द्यायचे नाही आहे तर ते पाकिट तुम्ही लाल रंगाच्या कपड्यात लपेटून तुमच्या तिजोरीत ठेवा.

मुंबई: तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या माणसांकडून ऐकले असेल की फाटलेले-जुने कपडे, चपला अथवा पर्स यांचा वापर करू नये मात्र काही लोकांसाठी त्यांच्या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी त्यांच्यासाठी लकी असतात. या वस्तू ते नेहमी आपल्या जवळ ठेवतात. मग ती गोष्ट बेल्ट असेल वा जुनी एखादी पर्स. आपल्यापैकी बरेचशे लोक अशा गोष्टींचा काही काळापर्यंत वापर करतात. यानंतर जेव्हा ही वस्तू खराब होते तेव्हा या गोष्टी नव्या गोष्टीला रिप्लेस केल्या जातात. मात्र जेव्हा लकी पर्सची गोष्ट येते तेव्हा ही पर्स फेकणे कठीण होते. Never throw away your old lucky purse

अधिक वाचा - बाहेरगावी जाताय मग हे वाचा; आज तब्बल 141 रेल्वे आहेत रद्द

जर तुमच्याकडेही अशीच तुमच्यासाठी लकी ठरलेली पर्स फेकायची नसेल तर तुम्ही खालील पद्धतीने त्याचा वापर करू शकता. 

जर तुम्ही जुनी पर्स नव्या पर्ससह बदलत आहात तेव्हा जुन्या पाकिटातील सामान काढून नव्या पाकिटात ठेवा. त्यानंतर जुन्या पाकिटात १ रूपयाचे नाणे लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. असे केल्या जी उर्जा तुमच्या जुन्या पाकिटात धनसंचय करत होती ती तशीच राहील. 

जर तुमच्यासाठी तुमचे जुने पाकीट लकी ठरत असेल तर ती फेकण्याची चूक कधीही करू नका. तसेच पर् रिकामी कधीही ठेवू नका. जुन्या पाकिटात तुम्ही तांदळाचे काही दाणे टाकून ठेवू शकता. त्यानंतर हे तांदळाचे दाणे नव्या पाकिटात ठेवा. असे केल्याने जुन्या पाकिटातील सकारात्मक उर्जा नव्या पर्समध्ये येईल. 

जर तुमचे तुमच्या जुन्या पाकिटावर प्रेम आहे आणि तुम्हाला ते फेकून द्यायचे नाही आहे तर ते पाकिट तुम्ही लाल रंगाच्या कपड्यात लपेटून तुमच्या तिजोरीत ठेवा. मात्र लक्षात ठेवा की ती पर्स रिकामी राहता कामा नये. त्यात तुम्ही तांदूळ, रुमाल, अथवा पैसे ठेवू शकता. 

अधिक वाचा - बर्थडे गिफ्ट मागणे भोवले, प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

जर तुमचे लकी पाकिट फाटले असेल  आणि तरीही तुम्हाला ते फेकून द्यायचे नसेल तर ते रिपेयर करून झाल्यावर आपल्याजवळ ठेवा. फाटलेले पाकिट आपल्याजवळ ठेवल्यास तर राहू कमकुवत होईल. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी