Astrology Tips: पुजा करताना का वापरत नाहीत स्टीलची भांडी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 13, 2021 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिंदू धर्मात पुजा करताना धातूची भांडी वापरणे अतिशय शुभकारक मानले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे पुजेसाठी स्टीलची भांडी का वापरत नाहीत. 

pooja
Astrology Tips: पुजा करताना का वापरत नाहीत स्टीलची भांडी 
थोडं पण कामाचं
  • शास्त्रानुसार स्टीलची भांडी पुजेसाठी शुभ मानली जात नाहीत
  • पुजेमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर केल्याने पुण्य प्राप्ती होत नाही. 
  • पितळ, तांबे सारख्या धातूंचा वापर पुजेमध्ये केल्याने फायदे होतात. 

मुंबई: आपल्या देशात अधिकतर लोक पुजा करताना धातूच्या भांड्याऐवजी स्टीलच्या भांड्याचा वापर करतात. धर्मानुसार स्टीलच्या भांड्याचा वापर पुजेमध्ये करणे शुभ मानले जात नाही. हिंदू धर्मात धातूच्या भांड्यांमध्ये केली जाणारी पुजा ही शुभ मानली जाते. शास्त्रानुसार पुजेमध्ये वापरली जाणारी विविध धातूंची भांडी वेगवेगळे फायदे देतात. पितळ आणि तांब्याची भांडी वापरल्याने अनेक फायदे होतात. 

पुजेमध्ये काय आहे फायदेशीर

स्टील, लोखंड अथवा अॅल्युमिनियमची भांड्यांचा वापर पुजेसाठी करणे अशुभ असते. इतकंच नव्हे तर या धातूची मूर्तीही पुजेसाठी शुभ मानली जात नाही. धातुच्या वस्तू पुजेसाठी शुभ मानल्या जातात. शास्त्रांनुसार पुजेमध्ये सोने, चांदी, पितळ आणि तांब्याची भांडी वापरणे लाभदायक असते. अशा भांड्यांतून जलाभिषेक केल्याने पुण्यप्राप्ती होते. 

स्टीलचा प्रयोग का करू नये

तज्ञांच्या मते स्टीलची भांडी पुजेसाठी वापरल्याने ती लवकर खराब होतात. त्यात गंज लागण्याची शक्यता असते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता या धातुच्या भांड्यानी केलेला जलाभिषेक शुभ मानला जातो. मान्यतेनुसार धातुच्या भांड्यातून पुजा केल्याने देव लवकर प्रसन्न होतात. 

यामुळे जीवनात अनेक कष्ट निर्माण होतात. जर तुम्ही इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्टीलचा भांड्याचा वापर करत आहात तर आजच थांबवा. त्याच्या जागी पितळ, तांबे, सोने अथवा चांदीसारखी भांडी वापराल. यामुळे तुमच्या घरात सुख वैभव नांदेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी