New year 2023 upay in marathi: नवीन वर्ष 2023 हे सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. हे नव वर्ष सर्वांना सुखात जावे तसेच सुख-समृद्धी मिळो आणि भरभराट होवो, वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ज्योतिष शास्त्रात सांगितलेले हे उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते. जाणून घेऊयात वर्षाच्या पहिल्या दिवशी नेमके कोणते उपाय करायला हवेत. (new year 2023 do these things you will get wealth and money in full-year upay read in marathi)
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजवंतांना उबदार कपडे, स्वेटर, ब्लँकेट दान करा. असे करणाऱ्या व्यक्तीच्या घरात सुख-समृद्धी येते.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी डोळ्यात काजळ भरा. यामुळे दोष दूर होतात आणि भीतीपासूनही मुक्ती मिळते. तसेच तुमच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांची स्थिती सुधारण्यास मदत होते.
हे पण वाचा : डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव
ज्योतिषशास्त्रानुसार, नारळाचा उपाय माणसाला वाईट नजरेपासून सुरक्षित करतो. नवीन वर्षाच्या पहिल्या मंगळवारी, गुरुवारी किंवा शनिवारी स्वत:वर आणि तुमच्या कुटुंबियांतील सदस्यांवर 21 वेळा नारळ उतरवा. त्यानंतर ते नारळ वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने वाईट नजर आणि दोष दूर होतात.
हे पण वाचा : लहान मुलांसाठी मनुक्याचे असंख्य फायदे
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री हनुमानाजींची पूजा करा. त्याला खूप खास महत्त्व आहे. बजरंगबलीची पूजा करण्यासोबतच मंदिरात काही खाद्यपदार्थाचा नैवेद्य द्या. तसेच गरीबांनाही अन्नपदार्थ खाऊ घाला.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)