नवी दिल्ली: Rashi Parivartan 2022: प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतो, असं ज्योतिषशास्त्रात (Astrology) सांगण्यात आलं आहे. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे तसंच यात नक्षत्र (Nakshatra) बदलत राहतात आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. आता पुढील 4 महिन्यांत तीन ग्रहांची स्थिती खूप खास असणार आहे, ज्याचा 4 राशीच्या लोकांवर चांगला आणि शुभ प्रभाव पडणार आहे. हे ग्रह बुध, मंगळ आणि गुरू आहेत. 21 ऑगस्ट 2022 रोजी बुध ग्रह राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर मंगळ ग्रहाचे संक्रमण होणार आहे.
चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांना 4 महिने भरपूर फायदे होणार आहेत.
मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांसाठी हे चार महिने खूप चांगले असणार आहे. त्यांची आतापर्यंत रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. नेटवर्क वाढेल. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून फायदा होईल. प्रवास किंवा टूर होईल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. धनलाभ होईल. लव्ह लाईफ देखील चांगली राहील.
अधिक वाचा- महाराष्ट्र पोलीस दलातील तिघांना शौर्य चक्र
सिंह राशी: सिंह राशीच्या लोकांना हे 4 महिने खूप आर्थिक लाभ देणारे ठरणार आहेत. मजबूत आर्थिक स्थितीमुळे खूप दिलासा मिळेल. पद-प्रतिष्ठाही वाढेल. नवीन घर-कार खरेदी करू शकता. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा नवीन काम सुरू होऊ शकते.
तूळ राशी: तूळ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ चांगला राहील. त्यांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. करिअर बदलायचे असेल तरीही यश मिळेल. स्थान बदलण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील. विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी: वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळणार आहे. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल. अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)