Nirjala Ekadashi Vrat 2022: निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही करत नाहीत या 6 गोष्टी, जाणून घ्या व्रताचे नियम

ज्येष्ठ शुक्ल एकादशीला (Ekadashi ) निर्जला (Nirjala) एकादशीचे व्रत केले जाते. यावेळी निर्जला एकादशीचे व्रत शुक्रवार 10 जून रोजी येणार आहे.  या उपवासात पाण्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे इतर उपवासांच्या तुलनेत हा उपवास (Fasting) कठीण मानला जातो.

Nirjala Ekadashi Vrat 2022
निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही करत नाहीत या 6 गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • निर्जला एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरीची कृपा प्राप्त होते.
  • निर्जला एकादशीच्या दिवशी दातूनने दात स्वच्छ करू नयेत.
  • निर्जला एकादशीच्या दिवशी पलंगावर झोपू नये.

Nirjala Ekadashi Vrat 2022: ज्येष्ठ शुक्ल एकादशीला (Ekadashi ) निर्जला (Nirjala) एकादशीचे व्रत केले जाते. यावेळी निर्जला एकादशीचे व्रत शुक्रवार 10 जून रोजी येणार आहे.  या उपवासात पाण्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे इतर उपवासांच्या तुलनेत हा उपवास (Fasting) कठीण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूची (Lord Vishnu) विशेष कृपा होते. असे मानले जाते की, जे लोक वर्षातील कोणत्याही एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या निर्जला एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरीची कृपा प्राप्त होते. निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये हे आपण आज जाणून घेणार आहोत

या 6 गोष्टी निर्जला एकादशीला करू नयेत

  • मान्यतेनुसार, निर्जला एकादशीच्या दिवशी दातूनने दात स्वच्छ करू नयेत. म्हणजेच आपल्यातील बरेच जण निंबाच्या काडीनं आपल्या दात स्वच्छ करत असतात. तर या दिवशी तसे करू नये. कारण या दिवशी झाडाच्या फांद्या तोडल्यानं भगवान विष्णू कोपतात, असे म्हटले जाते.  याचबरोबर आपला उपवास मोडून जात असतो. म्हणून या दिवशी निंबाच्या काडीचा वापर दात स्वच्छ करण्यास दातून म्हणून करू नये. 
  • निर्जला एकादशीच्या दिवशी आळस करणे वर्ज्य मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी आळस सोडून भगवान विष्णूचे स्मरण करणे उत्तम मानले जाते.
  • धार्मिक मान्यतांनुसार, निर्जला एकादशीच्या दिवशी पलंगावर झोपू नये. असे केल्याने व्रताचे फळ मिळत नाही, म्हणून या दिवशी उपवासा करणाऱ्याने जमिनीवर झोपावे.
  • निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी देवाच्या पूजेत तांदूळ (अक्षदा) वापरू नये. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तीळ वापरणे चांगले मानले जाते. याशिवाय या दिवशी भाताचे सेवन करू नये. जर तु्म्ही या गोष्टी वापरल्या तर तुमचे मन चंचल होते, त्यामुळे पूजेच्या वेळी मन विचलित होऊ शकते, असे मानले जाते.
  • एकादशी व्रताच्या वेळी कोणीही अपशब्द बोलू नये. जर तसे केले तर उपवास केल्याचा फायदा होत नाही. याशिवाय या दिवशी घरामध्ये कलह करू नये.  
  • निर्जला एकादशीच्या दिवशी मांस-मद्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. उपवास करणाऱ्यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले जाते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी