नवी दिल्ली: Perfect Match Of Zodiac Sign: प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला आपल्या आयुष्यातला जोडीदार योग्य (good partner) आणि चांगला मिळावा. त्यात मुख्य अपेक्षा असते ती म्हणजे त्या जोडीदारानं समजून घेतलं पाहिजे. त्याला प्रत्येक अडचणीत साथ देऊ शकेल. काही वेळा व्यक्तीमध्ये काही गोष्टींच्या अभावामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर (marital life) परिणाम होत असतो. अशा वेळी राशिचक्राच्या (zodiac sign) आधारे व्यक्तीचा स्वभाव अगोदरच जाणून घेतल्यास बऱ्याच अंशी त्या ओळखता येणं सोपं होऊन जातं. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप रोमँटिक असतात.
अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांसाठी योग्य जोडीदार शोधणे देखील थोडे कठीण होतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या राशीच्या लोकांची कोणासोबत परफेक्ट मॅच होऊ शकतात.
मेष राशी
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे. हे लोक धाडसी, महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी असतात. या राशीचे लोक आपल्या प्रिय व्यक्ती आणि नातेवाईकांसोबत खूप जवळ असतात. ते त्यांची खूप काळजी करत असतात. तूळ आणि धनु राशीच्या लोकांचे मेष राशीच्या लोकांशी चांगले जमते. त्याच वेळी, त्यांची सिंह राशी चांगली अनुकूलता देखील आहे.
अधिक वाचा- अशी आहे रणबीर कपूर-आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'ची स्टोरी?
वृषभ राशी
या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत, संयमी आणि साधा असतो. त्यांना शांतपणे जीवन जगणे खूप आवडते. एवढंच नाही तर हे लोक आपली स्वप्ने साकार करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या राशीचे लोक आपली आवड समजून घेण्यासाठी मित्राच्या शोधात असतात. या लोकांचं वृश्चिक राशीच्या लोकांशी चांगले जुळतं. दोन्ही राशींचे लोक उत्कट आणि प्रेरित असतात. वृषभ आणि वृश्चिक राशीचे लोक एकत्र राहत असतील तर वृषभ राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीचे लोक हुशार आणि चतुर स्वभावाचे मानले जातात. याशिवाय कन्या आणि मकर राशीशीही त्यांचं चांगले जमतं.
मिथुन राशी
या राशीचे लोक स्वभावाने खेळकर, उत्स्फूर्त आणि उत्साही असतात. मिथुन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचे राज्य आहे. धनु राशीशी त्यांची चांगली अनुकूलता असते. याशिवाय सिंह, कन्या आणि तूळ राशीही मिथुन राशीशी सुसंगत होते.
कर्क राशी
या राशीवर चंद्राचे अधिपत्य आहे आणि म्हणूनच तो खूप सहज आणि भावनिक आहे. हे लोक मनापासून विचार करतात. कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करतात. मकर राशीच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होतात. वृश्चिक आणि मीन राशीचे लोक कर्क राशीच्या लोकांशी चांगले जुळून घेतात.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)