Numerology 2022 : या दिवशी जन्माला आलेल्यांचे नवीन वर्ष असणार खास, नवीन नोकरी आणि होणार धनसंपत्तीचा लाभ

कुंडली, राशी आणि इतकेच नाही तर लोक आपल्या हस्तरेषा दाखवून आपले भविष्य जाणून घेतात. परंतु आपल्या जन्मतारखेवरही आपले भविष्य ठरत असते. याला शास्त्राला अंकशास्त्र म्हणतात. यासाठी जन्मवेळ माहित नसली तरी चालेल, आपल्या जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेता येतं. 

थोडं पण कामाचं
  • कुंडली, राशी आणि इतकेच नाही तर लोक आपल्या हस्तरेषा दाखवून आपले भविष्य जाणून घेतात
  • आपल्या जन्मतारखेवरही आपले भविष्य ठरत असते.
  • ज्यांचा भाग्यांक ६ आहे त्यांना २०२२ मध्ये नवीन नोकरी लागणार आहे.

Ank Jyotish (Numerology) 2022  : कुंडली, राशी आणि इतकेच नाही तर लोक आपल्या हस्तरेषा दाखवून आपले भविष्य जाणून घेतात. परंतु आपल्या जन्मतारखेवरही आपले भविष्य ठरत असते. याला शास्त्राला अंकशास्त्र म्हणतात. यासाठी जन्मवेळ माहित नसली तरी चालेल, आपल्या जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेता येतं. 

अंक शास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केल्यानंतर त्याचा एक मुलांक किंवा भाग्यांक निघतो. त्यालाच इंग्रजीत लकी नंबर म्हणतात.  समजा तुमचा जन्म ६, १५,२४ तारखेला झाला असेल तर तुमचा भाग्यांक ६ होतो, कारण या दोन आकड्यांची बेरीज केल्यास भाग्यांक ६ निघतो. तर ज्यांचा भाग्यांक ६ आहे त्यांना २०२२ मध्ये नवीन नोकरी लागणार आहे. तसेच त्यांना आगामी वर्षात धनसंपत्तीचाही लाभ होणार आहे. 

मागच्या वेळी आपण ज्यांचा भाग्यांक ९ आहे त्यांचे भविष्य पाहिले होते. आज ज्यांचा भाग्यांक किंवा लकी नंबर ६ आहे त्यांचे भविष्य आणि आगामी वर्ष कसे जाणार आहे हे पाहूया.

लकी नंबर ६ असलेल्यांचे बदलणार नशीब

अंकशास्त्रानुसार भाग्यांक ६ चा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रह ऐषो आराम, श्रीमंतीचा, आणि वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम समजला जातो. नव्या वर्षात हा भाग्यांक असलेल्या लोकांवर धन देवता कुबेरची विशेष कृपा असणार आहे.

नवी नोकरी मिळणार 

अंकशास्त्रानुसार भाग्यांक म्हणजेच लकी नंबर ६ असलेल्या लोकांना २०२२ मध्ये आवडीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. फक्त नोकरदारांसाठीच नव्हे तर उद्योजकांसाठीही २०२२ हे वर्ष चांगले राहणार आहे. भाग्यांक ६ असलेल्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची मोठी शक्यता आहे. 


वैवाहिक आयुष्यात वाढणार प्रेम

एकूणच ज्यांचा ज्यांचा भाग्यांक सहा किंवा लकी नंबर सिक्स आहे, त्यांचे आगामी वर्ष आनंदाचे असणार आहे. नव्या वर्षात आर्थिक बाजू चांगली असणार आहे. नवे घर, नव्या गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तर विवाहित असलेल्या व्यक्तींचे आयुष्यही चांगले असणार आहे, आयुष्यात जोडीदाराबर चांगले क्षण येणार आहेत तर एकमेकांमध्ये प्रेमही वाढणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी