Numerology 2022 Number 3 Horoscope in Marathi : ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे त्यांचा भाग्यांक हा ३ असतो. तीन अंकाचा स्वामी गुरू आहे. गुरू ग्रह ज्ञान आणि धर्माचा कारक असून चंद्र आणि सुर्य त्याचे मित्र आहेत. ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक तीन आहे त्यांच्यासाठी पुखराज शुभ रत्न आहे. ३ भाग्यांक असलेल्या व्यक्तींना शिक्षण, माध्यम, मॅनेजमेंट, कायदा आणि प्रशासन क्षेत्रात यश मिळतं. कुठल्यातरी धार्मिक गुरुच्या सान्निध्यात आल्यानंतरच या व्यक्तीचा उत्कर्ष होतो असे सांगितले जाते.
ज्यांचा भाग्यांक किंवा जन्मांक तीन आहे त्यांचे आरोग्य फेब्रुवारी ते जून दरम्यान चांगली नसणार. भाग्यांक तीन असलेल्या नागरिकांना मूत्रसंबंधीत किंवा यकृतसंबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्या नगारिकांना रक्तदान आणि शुगरचा त्रास आहे त्यांनी नोव्हेंबरपर्यंत धिक काळकी घ्यावी. आरोग्य चांगले राहील, विशेष अडचण येणार नाही.
ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांचा व्यवसाय तेजीत असणार आहे. फ्रेब्रुवारी ते एप्रिल हा व्यावसायिकांसाठी उत्तम काळ असणार आहे. तर आयटी आणि मॅनेजमेंटशी संबंध्बित असणार्या व्यक्तींना मे ते नोव्हेंबरदरम्यान परदेशात जाण्याची संधी आहे. या वर्षी पदोन्नती किंवा नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसिकांना धनप्राप्ती होईल.
ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांच्या प्रेमसंबंधात फेब्रुवारी महिन्यात काही अडचणी येऊ शकतात. ज्यांचे लग्न झालेले नाहीत एप्रिल नंतर विवाहाची शक्यता आहे. हे वर्ष वैवाहिक आयुष्य अगदी सुखद राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दोघांमध्ये तणाव असण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनसाथीसोबत चांगला प्रवास घडू शकतो.
ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांची आर्थिक स्थिती एप्रिल नंतर उत्तम असणार आहे. या वर्षी सोन्यात, शेअर मार्केट, घर किंवा स्थाव मालमत्तेत गुंतवणूक करावी. जूननंतर धनप्राप्ती होईल. मे ते नोव्हेंबर दरम्यान घर किंवा जमीन विकत घेण्याचा योग असेल. मार्च, सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये गाडी घेण्याचा योग येईल.
ज्यांचा भाग्यांक ३ आहे त्यांना जानेवारी महिना तितका चांगला नसणार. त्यानंतर येणार काळ चांगला असून मार्च, मे आणि सप्टेंबर हा शुभ काळ असेल.
दर गुरूवारी श्री विष्णूसहस्रानामाचा जप करावा. हळदीचा वापर करावा. भगवान विष्णूची उपासना करावी, अन्न दान करावे. गुरू आणि सुर्य बीज मंत्राचा जप करावा तसेच गायीला अन्न चारावे.