Numerology Number 4 Horoscope 2022 : भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींना भेडसवणार या समस्या, या उपायांनी होणार धनलाभ

Numerology Number 4 Horoscope 2022 ज्यांना जन्म ४,१३ किंवा २२ तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक ४ असतो. भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह राहू आहे. चार भाग्यांक असलेल्या व्यक्तींना मॅनेजमेंट किंवा आयटी सेक्टरमध्ये अधिक यश मिळते. हे लोक फार धार्मिक आणि श्रद्धाळू असता. जे काही काम हातात घेतात ते पूर्णत्वास नेतात.

number four numerology
भाग्यांक चार  
थोडं पण कामाचं
  • ज्यांना जन्म ४,१३ किंवा २२ तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक ४ असतो.
  • भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह राहू आहे.
  • हे लोक फार धार्मिक आणि श्रद्धाळू असतात.

Numerology Number 4 Horoscope 2022 : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र शाखेला तितकेच महत्त्व आहे. ज्या प्रमाणे आपली राशी, कुंडलीमधील ग्रह आणि नक्षत्रांचा आपल्या जीवनावर असतो तसाच आपल्या जन्म तारखेचाही प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. जन्म तारखेच्या अधारावरच मूलांक किंवा भाग्यांक काढला जातो. आज जाणून घेऊया  भाग्यांक किंवा मुलांक असलेल्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाणार आहे. (Numerology 2022 Number 4 Horoscope, Ank Jyotish Rashifal 2022 by Date of Birth and Name in marathi janmank chaar che ankfal)

ज्यांना जन्म ४,१३ किंवा २२ तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक ४ असतो. भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह राहू आहे. चार भाग्यांक असलेल्या व्यक्तींना मॅनेजमेंट किंवा आयटी सेक्टरमध्ये अधिक यश मिळते. हे लोक फार धार्मिक आणि श्रद्धाळू असतात. जे काही काम हातात घेतात ते पूर्णत्वास नेतात. त्यांचे काही धार्मिक गुरू असतात. राजकारणासाठी हा अंक अतिशय अनूकूल आहे. बँकिंग, माध्यम, स्पर्धा परीक्षा आणि न्यायव्यवस्थेत काम करणार्‍यांचा भाग्यांक चार असेल तर त्यांना उच्च पद मिळते. शनी आणि शुक्र हे ग्रह त्यांचे खास मित्र आहेत. त्यांना आठ क्रमांक खूप आवडतो त्यांच्यासाठी गोमेद हा शुभ रत्न आहे. 


भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींचे वार्षिक भविष्य


आरोग्य

चार भाग्यांक असलेल्या व्यक्तींना यावेळी आरोग्यात राहू आणि केतु त्रास देऊ शकतात. फेब्रुवारी आणि जूनमध्ये अधिक काळजी घ्यावी. भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींना रक्तदाब आणि हाडांचा त्रास जाणवू शकतो. ज्यांना रक्तदाब, शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी मे आणि नोव्हेंबरचा महिना त्रासदाय होऊ शकतो.


काम आणि व्यवसाय

ज्यांचा भाग्यांक चार आहे आणि ते एमबीए किंवा आयटी सेक्टरमध्ये असतील तर त्यांना यश मिळणार आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी. आयटी, माध्यम तसेच मॅनेजमेंटमधील व्यक्तींना १५ मार्चनंतरील काळ चांगला असणार आहे. १६ मे ते १५ नोव्हेंबर दरम्यान पदोन्नती किंवा नवी नोकरी मिळण्याची शक्यता. फिल्म किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता. 


वैयक्तिक आयुष

भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींचे वैयक्तिक आयुष आयुष्य सुखी आणि समाधनकारक असणार आहे. दाम्पत्याचे आयुष सुखी राहणार आहे. आयुष्याच्या जोडीदाराला फेब्रुवारी, ऑगस्ट किंवा नोव्हेंबरमध्ये आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. भाग्यांक ४ असलेल्या व्यक्तींचे यंदा प्रेम किंवा लग्नाची शक्यता आहे. त्यांच्यासाठी जानेवारी ते १५ फेब्रुवारी तसेच मे ते जुलै दरम्यानचा काळ अनुकूल असणार आहे. जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ सुखद असणार आहे.

आर्थिक स्थिति

ज्यांचा भाग्यांक ४ आहे त्यांना अंदा धनलाभ होणार आहे. गाडी किंवा घर घेण्याचा योग असणार आहे. फेब्रुवारी, मे, जून आणि नोव्हेंबरमध्ये आर्थिक परिस्थिती उत्तम असणार आहे. 

शुभकाळ


भाग्यांक चार असलेल्या व्यक्तींना १५ फेब्रुवारी ते १५ मेपर्यंत तसेच सप्टेंबर आणि डिसेंबर हा शुभ महिना असणार आहे. 

समस्यांवरील उपाय

आयुष्यात कुठलीही समस्या असेल तर दररोज श्रीसुक्त पठण करावे. बुधवारी भैरव देवाची पूजा करावी. उडीद आणि तीळ दान करून मोठ्या भावाचे आशीर्वाद घ्यावेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी