Numerology Today, 22 August 2022: सोमवारच्या दिवशी काय असणार तुमचा लकी नंबर? जाणून घ्या २२ ऑगस्टचे राशीफळ

आज आहे २२ ऑगस्ट २०२२, २२ या अंकात २ क्रमांक दोन वेळा आला आहे. दोन क्रमांक हा धर्म आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा संयुक्त अंक फार शुभ असतो. दोन अंक धार्मिक आध्यात्मिक, वैभवासाठी प्रसिद्ध आहे. हा अंक ४ अंकाप्रमाणे कार्य करतो. ४ चा स्वामीग्रह राहु आहे.

numerology
संख्याशास्त्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे २२ ऑगस्ट २०२२, २२ या अंकात २ क्रमांक दोन वेळा आला आहे.
  • दोन क्रमांक हा धर्म आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
  • हा संयुक्त अंक फार शुभ असतो.

Numerology Today (आजचे अंक राशिफळ) 22 August 2022:  आज आहे २२ ऑगस्ट २०२२, २२ या अंकात २ क्रमांक दोन वेळा आला आहे. दोन क्रमांक हा धर्म आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा संयुक्त अंक फार शुभ असतो. दोन अंक धार्मिक आध्यात्मिक, वैभवासाठी प्रसिद्ध आहे. हा अंक ४ अंकाप्रमाणे कार्य करतो. ४ चा स्वामीग्रह राहु आहे. आज २२ ऑगस्ट २०२२ चा भाग्यांक ९ असणार आहे. अंक ९ चा स्वामी ग्रह मंगल आहे. राहु, शनी, शुक्र आणि बुध यांचा मित्र आहे. सुर्य आणि शनी हे मित्र नाहीत. अंक ९चा मित्र अंक १, २ तसेच ३ आहे. (numerology 22 august 2022 know your lucky number)

आपल्या जन्मांकानुसार आजचे अंकफळ पहा

जन्मांक १ अंक राशीफळ 

शुभ अंक: 9

नोकरी आणि व्यवसाय : नोकरीच्या ठिकाणी ६ आणि ९ मुळे प्रगती होईल. सुर्य तसेच राहुत मित्र नाही. सुर्यामुळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. नेत्ररोगापासून मुक्ती मिळेल. यासाठी राहूसंबंधित तीळ उडीद दान करावे.

जन्मांक ३ अंक राशीफळ 

नोकरी आणि व्यवसाय : नोकरीच्या ठिकाणी दबाव वाढेल. नामांक ३ आणि ९ असलेल्या व्यक्तीला व्यवसायात लाभ मिळेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

शुभ अंक: ०१

जन्मांक ३ अंक राशीफळ 

नोकरी आणि व्यवसाय : गुरू आणि भाग्य स्वामी मंगलमुळे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनसाठी नवीन मार्ग सापडेल. अंक स्वामी गुरू आणि भाग्यस्वामी मंगळच्या मदतीने व्यवसायच्या ठिकाणी प्रगती होईल. शरीराचे विकार दूर होतील.

शुभ अंक : ६

जन्मांक ४ अंक राशीफळ

नोकरी आणि व्यवसाय : भाग्यांक ९ मीडिया, बँकिंग तसेच आयटी क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना मोठे यश मिळणार आहे. व्यवसायात नामांक ४ आणि ६ वरून शुभ लाभ होणार आहे. आरोग्य चांगले राहील.

शुभ अंक:४

जन्मांक ५ अंक राशीफळ

नोकरी आणि व्यवसाय : व्यवसायात जन्मांक ७ आणि ९ मुळे लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडलेली प्रगती होईल. तसेच आरोग्य सुधारेल.

जन्मांक ६  अंक राशीफळ 

नोकरी आणि व्यवसाय : आज भाग्य अंक ९ आहे. आज व्यवसयात शुक्र आणि शनीचा पाठिंब मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.

शुभ अंक: ७ 

जन्मांक ७ अंक राशीफळ 

नोकरीच्या ठिकाणी कामाचे समाधान मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याच्या बाबतीत श्वासनाचे विकार असलेल्यांनी काळजी घ्यावी.

शुभ अंक: ४

जन्मांक ८  अंक राशीफळ 

आज शनी, बुध आणि मंगळचा पाठिंबा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी उन्नती होईल. मंगळ आणि राहुमुळे व्यवसायात मोठे यश मिळेल. आरोग्य सुधरेल.

शुभ अंक: ७

जन्मांक ९  अंक राशीफळ 

व्यवसायात राहू आणि मंगळाचा पाठिंबा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी ४ आणि ९ नामांक असलेल्या उच्चअधिकार्‍यांमुळे मदत होईल. आरोग्य चांगले राहील. धार्मिक पुस्तकं दान करा.

शुभ अंक : २

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी