Numerology in marathi | नवी दिल्ली : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे विश्लेषण केले जाते आणि परिणाम देखील वर्तवले जातात. त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही (Numerology) गुणांच्या आधारे विश्लेषण केले जाते. मानवी जीवनात अंकाचे एक महत्त्वपूर्ण तसेच विशेष स्थान आहे. काही अंक लकी असतात, तर काही अंक अनलकी ठरतात. अशाच अंकाचे काही मूलांक ठरवले जातात. लक्षणीय बाब म्हणजे ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ३, १२,२१ किंवा ३० तारखेला होतो त्यांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचे स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत. असे मानले जाते की या मूलांकात जन्मलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना कोणासमोरही झुकणे बिल्कुल आवडत नाही. त्यांना त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य खूप प्रिय असते. अशाच तर्कवितर्कांनी भरलेले जीवन मूलांक ३ च्या लोकांचे असते. (Numerology 3 People radix are self-respecting and have the special grace of Jupiter).
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक क्रमांक ३ असतो, त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी, वीर, स्वातंत्र्यप्रेमी, बुद्धिमान असतो, ते कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात. तसेच हे लोक स्पष्टवादी आणि पैसे कमवण्याच्या बाबतीत हुशार असतात.
हे लोक आपले नाते चांगले सांभाळतात. ते त्यांच्या भावंडांसाठी खूप काही करतात पण त्यांना त्यांच्या भावंडांकडून फारसा पाठिंबा मिळत नाही. पण त्यांचे संबंध सर्वांशीच चांगले असतात. त्याचे अनेक मित्र आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांची मूलांक ३,६,९ यांपेक्षा अधिक चांगले असते. मात्र अनेकदा त्यांच्या मित्रांकडून त्यांची फसवणूक होते.
विवाह : अंकशास्त्रानुसार त्यांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी नसतात. पण वैवाहिक जीवन सुखी असते. हे लोक कामाच्या बाबतीत ताट स्वभावाचे असतात परंतु त्यांच्या मान-सन्मानाकडे ते विशेष लक्ष देतात. त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
करिअर : मूलांक ३ सैन्य, पोलीस, अधिकारी, सचिव, लेखक, शिक्षक, सेल्समन आणि धार्मिक उपदेशक, कथा सांगणारा इत्यादी पदावर कार्य करू शकतात. हे लोक त्यांच्या कामात तरबेज असतात.
मूलांक ३ वर बृहस्पती ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे ३ मूल्यांकातील लोकांना गुरू बृहस्पतींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या लोकांनी दर गुरुवारी गायीला गूळ आणि हरभरा खाऊ घातल्यास त्यांच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकते.