Vinayak Chaturthi image: विनायक चतुर्थीनिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

विनायक चतुर्थीनिमित्त गणेशाची आराधना केली जाते. आज (३ जून २०२२) विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.

vinayak chaturthi
विनायक चतुर्थी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विनायक चतुर्थीनिमित्त गणेशाची आराधना केली जाते.
  • आज (३ जून २०२२) विनायक चतुर्थी आहे.
  • विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.

मुंबईः विनायक चतुर्थीनिमित्त (Vinayak Chaturthi) गणेशाची (Ganpati Bappa) आराधना केली जाते. आज (३ जून २०२२) विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. विनायक चतुर्थी निमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा. पूजा (Puja) करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा. दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा. राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल करावा. 

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा..

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी