Sant Narhari Sonar punyatithi 2023 in marathi : संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारे संदेश 

Sant Narhari Sonar death anniversary : संत नरहरी सोनार हे संत परंपरेत महान संत झाले.  पंढरीत शिवभक्तांचे विठ्ठलभक्त झाल्याची सुरस कथा आपण सर्वांनी ऐकली असेल अशा संत नरहरी सोनार यांनी वंशपरंपरेनुसार  नाम संवस्तर शके १२३५ माघ वद्य तृतिया या सोमवार इसवी सन १२८५ समाधी घेतली.

on the occasion of sant narhari Sonar punyatithi 2023 salute his memory through greetings facebook messages whatsapp status
संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मेसेज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संत नरहरी सोनार हे संत परंपरेत महान संत झाले.
  •  नाम संवस्तर शके १२३५ माघ वद्य तृतिया या सोमवार इसवी सन १२८५ समाधी घेतली.
  • या दिवशी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २  फेब्रुवारी १३१४ ही तारीख होती. 

Sant Narhari Sonar death anniversary : संत नरहरी सोनार हे संत परंपरेतील महान संत झाले.  पंढरीत शिवभक्तांचे विठ्ठलभक्त झाल्याची सुरस कथा आपण सर्वांनी ऐकली असेल अशा संत नरहरी सोनार यांनी वंशपरंपरेनुसार  नाम संवस्तर शके १२३५ माघ वद्य तृतिया या सोमवार इसवी सन १२८५ समाधी घेतली.  या दिवशी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २  फेब्रुवारी १३१४ ही तारीख होती. 

संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. संत नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’ , ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’ , ‘माझे प्रेम तुझे पायी’ आणि  ‘ देवा तुझा मी सोनार ‘ अभंग प्रसिद्ध आहेत.

नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.

संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५ श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुरुधा बुधवार रोजी पहाटे प्रातः काळी झाला. त्यांचा बारशाचे दिवशी महानयोगी चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज आलेत आणि त्यानीच बाळाचे नावं नरहरी असे ठेवले. वयाचा सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडुन गुरु उपदेश नाथ संप्रदायाची दिक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाचा अठरा ते वीस दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. साल सुमारे १२७६ असावे आशा तर-हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखा-समाधानाने सुरु झाला.

अशा महान संताला अभिवादन करणारे मेसेज तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना पाठवू शकतात. 


 संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारे संदेश 
 

sant narhari sonar 1
चरणावरी माथा नरहरी ठेविला । 
हृदयी बिंबला पांडुरंग ।। 

संत नरहरी सोनार यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

sant narhari sonar

शिवच विठ्ठल आहे
असा झाला साक्षात्कार, 
तेव्हापासून विठ्ठलमय 
झाले नरही सोनार ।।

संत नरहरी सोनार यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

sant narhari sonar 3

देह -विदेह याचा मानुनी कंटाळा ।
बाणलीसे कळा परिपूर्ण ।।
म्हणे नरहरी सोनार चरणी दृढ भाव ।
अवघा भासे देव जळी-स्थळी ।।

संत नरहरी सोनार यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

sant narhari sonar 4
अखंड हें मनीं स्मरा चितामणी
हृदयी हो ध्यानी सर्वकाळ ।।

संत नरहरी सोनार यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

sant narhari sonar
देवा तुझा मी सोनार 
तुझ्या नामाचा रे व्यवहार 

संत नरहरी सोनार यांना 
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी